Manohar Lal Khattar On Jawaharlal Nehru: केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री मनोहर लाल खट्टर यांनी रविवारी (12 जानेवारी 2025) देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्याबाबत एक मोठे वक्तव्य केले आहे. 'जवाहरलाल नेहरू योगायोगाने भारताचे पंतप्रधान झाले. खरं तर, सरदार वल्लभभाई पटेल आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्या पदासाठी पात्र होते', असे म्हणत त्यांनी नवीन वादाला तोंड पोडले आहे.
हरियाणाच्या रोहतक येथील महर्षी दयानंद विद्यापीठात बोलताना खट्टर म्हणतात, 'मला सांगायचे आहे की, पंडित जवाहरलाल नेहरू अपघाताने पंतप्रधान झाले. त्यांच्या जागी सरदार वल्लभभाई पटेल आणि डॉ.बी.आर.आंबेडकर यांसारखे लोक पात्र होते. डॉ. आंबेडकरांची भूमिका त्यांच्यापेक्षा कमी नव्हती, पण जे काही झाले घडले, हा त्या काळातील जनतेचा निर्णय होता.'
आंबेडकरांच्या अंत्यसंस्कारासाठी जागा दिली नाहीखट्टर पुढे म्हणतात, 'या देशाचे संविधान हा आपला पवित्र ग्रंथ आहे आणि त्याला आकार देण्यासाठी डॉ. बी.आर. आंबेडकरांचे योगदान आपण नेहमी लक्षात ठेवले पाहिजे. आपण वेळोवेळी त्यांचा आठवण काढली पाहिजे. लक्षात ठेवा की, आंबेडकरांनादेखील अडचणींचा सामना करावा लागला. त्यांच्या मृत्यूनंतर दिल्लीत अंत्यसंस्कारासाठी जागा देण्यात आली नाही नव्हती.'
भाजप सरकारमध्ये आंबेडकरांचा गौरव'सरकार सत्तेवर आल्यानंतर आंबेडकरांच्या नावाशी संबंधित पाच पवित्र स्थळांची स्थापना करण्यात आली. या कार्यकाळात डॉ.आंबेडकरांबद्दल आदर दाखवला गेला, जो यापूर्वी कधीही झाला नव्हता. आज भारताच्या स्वातंत्र्यासाठी योगदान देणाऱ्या कोणत्याही नेत्याला सर्वोच्च सन्मान द्यायचा असेल, तर तो नक्कीच डॉ. आंबेडकरांना दिला जाईल, असेही खट्टर यावेळी म्हणाले.