मनपाला भूसंपादन होणार सोपे टीडीआर दुप्पट : घरांच्या किंमतीही कमी होण्यास मदत
By admin | Published: January 29, 2016 10:39 PM
जळगाव : शासनाने १८ मनपांमध्ये शासन वा स्थानिक स्वराज्य संस्थांनी केलेल्या भूसंपादनावर टीडीआर (ट्रान्सफरेबल डेव्हलपमेंट राईट) दुप्पट करण्याच्या शासन निर्णयामुळे मनपाचे आरक्षित जागांचे निधीअभावी रखडलेले भूसंपादन तातडीने करणे शक्य होणार आहे.
जळगाव : शासनाने १८ मनपांमध्ये शासन वा स्थानिक स्वराज्य संस्थांनी केलेल्या भूसंपादनावर टीडीआर (ट्रान्सफरेबल डेव्हलपमेंट राईट) दुप्पट करण्याच्या शासन निर्णयामुळे मनपाचे आरक्षित जागांचे निधीअभावी रखडलेले भूसंपादन तातडीने करणे शक्य होणार आहे. महापालिका क्षेत्रात विकास आराखड्यानुसार मनपाकडून जेव्हा खाजगी जागांचे भूसंपादन केले जाते. तेव्हा पैशाच्या रूपात मोबदला न देता त्याबदल्यात संबंधिताला टीडीआर दिला जातो. हा टीडीआर अन्यत्र बांधकामावर नियमानुसार वापरून इमारतीची उंची वाढवून बांधकाम करणे शक्य होते. त्यामुळे टीडीआरला भरपूर मागणी असते. अनेकांचा तर टीडीआर विक्रीचा व्यवसाय असून टीडीआरचा काळाबाजारही केला जातो. मात्र शासनाने आता हा टीडीआर दुप्पट केल्याने मुबलक टीडीआर उपलब्ध होऊन त्याचे दर घसणार आहेत. मात्र टीडीआर देऊन भूसंपादन करणेदेखील सोपे होणार असल्याची माहिती नगररचना विभागातील सूत्रांनी दिली.---- कोट---इमारतींची उंची वाढल्याने बांधकामांचा खर्च कमी होऊन स्वस्तात घरे उपलब्ध होऊ शकतील.-चंद्रकांत निकम, सहायक संचालक, नगररचना--- इन्फो---टीडीआरचे दर घटणारसध्या सहजासहजी टीडीआर मिळत नसल्याने त्याचे भाव वधारलेले आहेत. ए झोनमध्ये (गावठाण) टीडीआर मिळतो, मात्र तेथील बांधकामावर तो वापरता येत नाही. बी-झोनमधील टीडीआरची किंमत ४०० ते ५०० रुपये चौ.फूट तर सी-झोन मधील टीडीआरची किंमत सध्या १५० ते २०० रुपये चौरस फूट आहे. दुप्पट टीडीआर उपलब्ध झाल्यास हे दर घसण्याची शक्यता आहे.--- इन्फो---इमारतींची उंची २ मजल्याने वाढणारमनपा सध्या ५ मजल्यांपर्यंत म्हणजे १५ मीटर उंचीपर्यंत बांधकामाला मंजुरी देते. मात्र टीडीआर दुप्पट झाल्याने तसेच नवीन प्रस्तावित डीसी रूल्सनुसार इमारतींची उंची ६ मीटरने वाढणार आहे. त्यामुळे ७ मजली इमारतींना मंजुरी मिळू शकेल.