शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबतच्या मैत्रीला ७८ वर्ष पूर्ण होताच रशियानं केली मोठी मागणी; चीनला मान्य होणार?
2
राज्यासमोर पाणीसंकट! धरणांतील पाणीसाठा ४१ टक्क्यांवर, कुठे किती पाणी शिल्लक?
3
हृदयद्रावक घटना! अंघोळीसाठी गेलेल्या मायलेकासह मावशीचा तापी नदीत बुडून मृत्यू
4
Trigrahi Yoga 2025: शनि, शुक्र आणि बुधाची त्रिग्रही युती; 'या' पाच राशींच्या आर्थिक वाढीला देतील गती!
5
फेब्रुवारीनंतर मार्च महिन्यातही 'आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ'चा पुरस्कार भारताकडेच!
6
मोटारसायकलवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, नागपुरात रेस्टॉरंट मालकाची हत्या!
7
टॅरिफवरुन डोनाल्ड ट्रम्प सरकार धोक्यात? अमेरिकेत खटला दाखल; काय आहे प्रकरण?
8
सीएसएमटी स्थानकावर आता होणार ‘रेलमॉल’, १८ टक्के काम पूर्ण; १ हजार ८०० कोटींचा खर्च
9
खळबळजनक! सुशिक्षित कुटुंब अचानक वेड्यासारखं वागू लागलं, स्मशानभूमीतून आणली राख अन्...
10
Gold Loan व्यवसायात 'या' दिग्गज कंपनीची एन्ट्री, २०००% पेक्षा अधिक वाढलाय कंपनीचा शेअर
11
धक्कादायक! आई-बाप आहेत की शैतान, जीवापाड जपलेल्या मुलीलाच विकले
12
Walmik Karad : धनंजय मुंडेंकडून वाल्मीक कराडच्या एन्काऊंटरचा प्रयत्न; कासलेंचा गंभीर आरोप
13
IPL 2025: काव्या मारनने खेळला मोठ्ठा डाव! संघात घेतला द्विशतक ठोकणारा नवा कोरा 'बिगहिटर'
14
Murshidabad Violence : "सर्व जळून खाक, काहीही शिल्लक नाही; अनेक कुटुंबांनी घर सोडून पळून जाण्याचा घेतला निर्णय"
15
Mumbai: नियमांचा बट्ट्याबोळ! ट्रेड सर्टिफिकेट नाही, तरी मुंबईत टू व्हीलर विक्री जोरात
16
'फर्जंद' नसता तर 'छावा' आलाच नसता! अजय पूरकर स्पष्टच बोलले, म्हणाले- "दिग्पालने सुरुवात केली नसती तर..."
17
टायगर अभी जिंदा है! सलमानने बायसेप्स दाखवत शेअर केली पोस्ट, रणवीर सिंह कमेंट करत म्हणतो...
18
वो बुलाती है मगर जाने का नही..! नजरेनं 'ती' करते घायाळ; आतापर्यंत ५० जण फसले, पोलीस हैराण
19
कमालच झाली राव! लॉकडाऊनमध्ये जन्मलेल्या मुलांमध्ये जबरदस्त इम्यूनिटी, पडतात कमी आजारी
20
Agristack farmer registration: तुम्ही ॲग्रीस्टॅक योजनेचा शेतकरी ओळख क्रमांक घेतला का?

मानवी कश्यप बनली देशाची पहिली ट्रान्सजेंडर सब-इन्स्पेक्टर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2024 10:44 IST

तीन ट्रान्सजेंडर्सची पोलिस निरीक्षक म्हणून नियुक्ती करणारे बिहार हे देशातील पहिलेच राज्य बनले आहे.

एस.पी. सिन्हा

पाटणा : बिहारपोलिस सेवा आयोगाने बिहारपोलिसांमधील पोलिस उपनिरीक्षक स्पर्धा परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर केला आहे. शारीरिक क्षमता, शैक्षणिक पात्रता, वय आणि आरक्षण आदी पात्रता या आधारे ३ हजार ७२७ उमेदवारांमधून १२७५ उमेदवारांची अंतिम निवड केली आहे. या निकालामध्ये तीन ट्रान्सजेंडर्सचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे तीन ट्रान्सजेंडर्सची पोलिस निरीक्षक म्हणून नियुक्ती करणारे बिहार हे देशातील पहिलेच राज्य बनले आहे. यापूर्वी केरळमध्ये ट्रान्सजेंडरला सरकारी सेवेत  कॉन्स्टेबल म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे.

समाजाकडून छळ

निवड झालेल्या तीन ट्रान्सजेंडर्सपैकी भागलपूरची मानवी मधु कश्यप ही ट्रान्सवुमन आहे. कश्यप ही देशातील पहिली ट्रान्सजेंडर सब-इन्स्पेक्टर बनली आहे. सामाजिक स्तरावर अनेक प्रकारच्या छळाचा सामना करणारी मानवी २०१४ मध्ये घरातून पळून गेली होती.

घरातून पळून गेली, शिकविण्यास नकार दिला पण...

मानवीने सांगितले की, माझ्यामुळे घरातील सदस्यांना सर्व प्रकारच्या वाईट गोष्टी ऐकायला मिळायच्या आणि मन अस्वस्थ व्हायचे. शेवटी कोणताही पर्याय न उरल्याने मी घर सोडून पळून गेली. मानवीने राज्यशास्त्रासह मॅट्रिक इंटर आणि बीए ऑनर्सचे शिक्षण घेतले आहे. 

समाजात ट्रान्सजेंडर्सबद्दलचा चुकीचा दृष्टिकोन पाहून मानवीला काहीतरी करण्याची प्रेरणा मिळाली आणि याच प्रेरणेने ती २०२२ मध्ये पाटण्यात आली. पाटण्यात आल्यानंतर तिचा संघर्ष सुरूच राहिला. मधु अनेक कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये गेली. पण, तिला शिकवण्यासही सर्वांनी नकार दिला. 

याचदरम्यान तिची भेट गुरु रहमानशी झाली. रहमानने तिला प्रोत्साहन दिले आणि तिच्यासोबत इतर दोन ट्रान्सजेंडर्सनाही इन्स्पेक्टरची परीक्षा उत्तीर्ण होण्यास मदत केली. 

ट्रान्सजेंडर ही देखील देवाची देणगीच...

मानवी तिच्या यशाचे श्रेय तिचे आई-वडील आणि गुरु रहमान यांना देते. ती म्हणते की, ट्रान्सजेंडरचे जीवन सोपे नसते, परंतु या सर्व लोकांनी तिला नेहमीच प्रोत्साहन दिले. मानवी सांगते की, ती नियमितपणे ५ ते ६ तास अभ्यास करायची. तिचे वडील आता या जगात नाहीत, पण त्यांच्या साहसाने तिला इथपर्यंत पोहोचण्यास खूप मदत केली. 

समुदायासाठी खूप काम करणार असल्याचे तिने सांगितले. ट्रान्सजेंडर्सबद्दल लोकांच्या वर्तनात बदल घडवून आणण्याचा तिचा प्रयत्न आहे. ट्रान्सजेंडर ही देखील देवाची देणगी आहे आणि त्यांच्याकडे वेगळे पाहण्याची गरज नाही. त्याचे यश इतर अनेक ट्रान्सजेंडरसाठी प्रेरणा बनू शकते, जे समाजात त्यांच्या हक्कांसाठी आणि सन्मानासाठी झगडत आहेत, असे तिने सांगितले. 

टॅग्स :BiharबिहारPoliceपोलिस