अमेरिकेसह अनेक देशांना योगी सम्राट ओमदासांच्या ब्रानादाची भुरळ
By admin | Published: September 06, 2015 11:09 PM
नाशिक : भारतासह अमेरिका, कॅनडा, इंग्लंड, फ्रान्स आदि देशात ब्रानाद व योगाचे धडे देणारे योगी सम्राट ओमदासजी महाराज साधुग्राममध्ये दाखल झाले आहेत. ब्रानादही जीवनाची खरी अनुभूती असल्याचे ते सांगतात. त्यांच्या ब्रानादाची विविध देशांना भुरळ पडली आहे.
नाशिक : भारतासह अमेरिका, कॅनडा, इंग्लंड, फ्रान्स आदि देशात ब्रानाद व योगाचे धडे देणारे योगी सम्राट ओमदासजी महाराज साधुग्राममध्ये दाखल झाले आहेत. ब्रानादही जीवनाची खरी अनुभूती असल्याचे ते सांगतात. त्यांच्या ब्रानादाची विविध देशांना भुरळ पडली आहे. ओमदासजी महाराज गेल्या सहा वर्षांपासून ध्यानधारणा व योगाचे महत्त्व पटवून देण्यासाठी विश्वभरात भ्रमण करीत आहेत. सॅनफ्रिन्सिसको येथे त्यांना योग गुरू म्हणून मान्यता देण्यात आली असून, त्याठिकाणी त्यांचा जन्मदिवस साजरा केला जात आहे. त्यादिवशी तेथील सर्व शाळांना व शासकीय कार्यालयांना सुटी देण्यात येत असते. विदेशात भारतीय योग गुरूचा प्रभाव वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यात ओमदास महाराज यांचा योग व ब्रानादाची विविध देशांतील नागरिकांना भुरळ पडली आहे. त्यामुळे विश्वभरातील भाविक त्यांच्याशी जोडले गेले आहेत. योगी ब्राशक्तीला आत्म्याशी जोडण्याचे कार्य करतात आणि त्यात एकचित्त होतात. परमेश्वराचे विविध स्वरूप असून, भक्तांच्या रक्षणासाठी ते विविध भूमिका पार पाडत असतात. योगी शिष्यासाठी सर्व काही असतात. योग गुरुद्वारे दिले गेलेले ज्ञान प्रमाणित असते. कारण ते ज्ञान अनुभवाच्या आधारे दिले गेलेले असते. गुरू जात भेद मानत नाही, मानवतेसाठी कार्य करत राहतात, आत्मा परमेश्वराचा अंश असून, तेच सत्य तुम्हाला स्वत:मध्ये शक्ती प्राप्त करून देईल आणि मदत करेल अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. इग्लंड, फ्रान्समध्ये शिबिर सध्या योगी सम्राट ओमदास महाराज यांचे इंग्लंड, फान्समध्ये योग व ध्यानधारणाचे धडे येथील नागरिकांना देण्याचे कार्य सुरू आहे. तसेच अध्यात्मातील महत्त्वपूर्ण मानल्या जाणार्या ब्रानादाची अनुभूती करून देण्याचे त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. त्यासाठी सहा वर्षात सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ त्यांचा विदेश दौर्याचे नियोजन असते. फोटो: (०६पीएचएसपी १२९)