शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
2
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
3
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
5
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
6
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
7
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
8
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
9
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
10
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
11
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
12
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
13
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
14
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
15
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
16
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
17
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
18
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
19
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

बियास नदीच्या काठावरील १२ गावे पाण्याखाली; पोंग धरणाच्या पाण्याची पातळी १३९७ फुटांवर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2023 11:23 PM

धरणाच्या तलावात साडेसात लाखांहून अधिक पाणी शिरल्याने धरणाची पाणीपातळी १३९७ फुटांवर पोहचली होती.

नवी दिल्ली: पंजाब आणि हिमाचल प्रदेशातील जवळपास १२ गावे बियास नदीच्या दोन्ही बाजूंनी पाण्याखाली गेली आहेत. प्रशासनाने लोकांना बाहेर काढण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दल (NDRF) भारतीय लष्कर आणि हेलिकॉप्टर तैनात केले आहेत. बीबीएमबीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, हिमाचल प्रदेशमध्ये १२ आणि १३ तारखेला जोरदार पाऊस झाला, त्यामुळे धरणातील पाण्याची पातळी अचानक वाढली.

धरणाच्या तलावात साडेसात लाखांहून अधिक पाणी शिरल्याने धरणाची पाणीपातळी १३९७ फुटांवर पोहचली होती. सायंकाळपर्यंत पाण्याची पातळी १३९९ फुटांच्या आसपास पोहोचली होती. धरणात सतत पाण्याची आवक सुरू असल्याने पूर दरवाजातून एक लाख क्युसेकहून अधिक पाणी सोडण्यात आले. त्यामुळे सखल भागात पूरस्थिती निर्माण झाली होती. 

अतिरिक्त पाणी सोडण्यापूर्वी, संबंधित राज्य सरकारे, विभाग आणि सखल भागातील बाधित क्षेत्रांना सल्ला देण्यात आला होता. मात्र यामुळे अनेक गावे पाण्यात बुडाली. पाण्यात अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी प्रशासनाने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दल, भारतीय लष्कर आणि हेलिकॉप्टरची मदत घेतली. नदीच्या दोन्ही काठावरील शेकडो एकर भात, मका, बाजरी, ऊस पिके उद्ध्वस्त झाली आहेत. 

नदीच्या काठावर वसलेल्या बेला लुध्याडचन, हलेध, परळ, रियाली, मंड बाधपूर या गावांमधील अनेक कुटुंबांना हेलिकॉप्टरने हलवण्यात आले आहे. पाँग धरणातील पाण्याची पातळी १३९७ फूट नोंदवण्यात आली. ते धोक्याच्या चिन्ह १३९५ च्या फक्त दोन फूट वर आहे. तलावात पाण्याची आवक ५५३६७ क्युसेक आहे, तर शाह कालवा बंधार्‍यात फ्लड गेट व टर्बाइनद्वारे एकूण १३८२२३ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

टॅग्स :floodपूरPunjabपंजाबHimachal Pradeshहिमाचल प्रदेश