कसबे सुकेणे : ऐरवी वर्षानुवर्ष गोदावरीच्या पाण्याखाली असलेले निफाड तालुक्यातील चांदोरी येथील विविध देवदेवतांची मंदिरे यंदा गोदावरीतील पाण्याअभावी उघडी झाली असून, शेकडो वर्षांचे अतिशय पुरातन इंद्रदेवाचे मंदिर अनेक वर्षांनंतर दर्शनासाठी खुले झाले आहे.दक्षिणगंगा म्हणून ओळखल्या जाणार्या नाशिक जिल्ात गोदेच्या त्र्यंबकेश्वर ब्रागिरी उगमापासून ते थेट नांदूरमधमेश्वर धरणापर्यंत गोदावरी नदीमध्ये शेकडो पुरातन मंदिरे आहेत. निफाड तालुक्यातील चांदोरी येथे गोदावरी चंद्रकार झालेली आहे. त्यामुळे धार्मिक दृष्ट्या चांदोरीला महत्त्व असल्याचे समजते. याठिकाणी गोदेच्या पात्रात विविध ठिकाणी महादेवाच्या पिंडी असून, इंद्रदेवाचे दगडी कोरीव काम असलेले सर्वांग सुंदर असे मंदिर आहे. हे मंदिर सुमारे दहा हजार वर्षांपूर्वीचे असल्याचा दावा काही ज्येष्ठ नागरिकांनी केला आहे. गेली शेकडो वर्ष हे मंदिर पाण्यात असून, केवळ दगडी नक्षीकाम असलेल्या कळसाचे दर्शन होत असते. यंदा कमी प्रजन्यमानामुळे आणि मराठवाड्याला सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे गोदावरी नदीतील पाणी ठिकठिकाणी आटू लागले आहे. चांदोरी येथील गोदापात्र सहसा आटत नाही. यंदा मात्र उगमस्थानाकडून येणार्या पाण्याचा स्रोत बंद झाल्याने दर्शनासाठी दुर्मीळ असलेली विविध देवदेवतांची मंदिरे भाविकांना खुली झाली आहे. यापूर्वीही दोन तीन वेळेस हे मंदिर उघडे पडले होते, अशी माहिती स्थानिक ग्रामस्थांनी दिली. ड्ढश3 घेणे गोदाकाठ गावांना पाणीटंचाई मराठवाड्याला सोडलेल्या पाण्यामुळे नाशिक शहरासह जिल्ाला पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे- गोदाकाठची शेती उजाड होत असून, अनेक वर्षांनंतर गोदावरी आटू लागल्याने दुष्काळाची भीषणता गोदाकाठी दिसू लागली आहे.फोटो ष्ड्डद्बशठ्ठ : निफाड तालुक्यातील चांदोरी येथे अनेक वर्षांनंतर दर्शनसाठी खुले झालेले इंद्र देवाचे मंदिर. ( छाया : निलेश सगर , सुकेणे) (११ कसबेसुकेणे)
अनेक वर्ष पाण्यात असलेले इंद्रदेव मंदिर झाले खुले
By admin | Published: March 11, 2016 10:26 PM