शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
2
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
4
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
5
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
6
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
7
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
8
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
9
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
10
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
11
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
12
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
13
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
14
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
15
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

तेलगू देसमच्या आमदार व माजी आमदाराची हत्या, माओवाद्यांनी कारखाली उतरवून गोळ्या झाडल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2018 5:52 AM

दीर्घकाळ शांत राहिलेल्या माओवाद्यांनी (भाकप) रविवारी सत्तारूढ तेलगू देसमचे आमदार किदारी सर्वेश्वर राव (वय ४३ वर्षे) आणि माजी आमदार सावेरी सोमू यांची हत्या करीत खळबळ उडवून दिली आहे.

हैदराबाद - दीर्घकाळ शांत राहिलेल्या माओवाद्यांनी (भाकप) रविवारी सत्तारूढ तेलगू देसमचे आमदार किदारी सर्वेश्वर राव (वय ४३ वर्षे) आणि माजी आमदार सावेरी सोमू यांची हत्या करीत खळबळ उडवून दिली आहे. हे दोघेही आंध्र प्रदेश-ओडिशा सीमेवर ग्राम दर्शनी या सरकारी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जात होते. सुमारे ५० सशस्त्र नक्षलवाद्यांचा हल्ल्यात सहभाग असल्याचा अंदाज आहे. दरम्यान आंध्र-ओडिशा सीमेवर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.अराकू (राखीव) मतदारसंघाचे आमदार किदारी सर्वेश्वर राव आणि सोमू हे लिप्पिटीपुत्या या गावी पोहोचले असताना माओवाद्यांनी हल्ला केला. सर्वेश्वर राव २०१४ मध्ये वायएसआर काँग्रेसचे उमेदवार म्हणून निवडून आले होते, मात्र नंतर तेलगू देसममध्ये प्रवेश केला होता. माओवाद्यांचा एक गट गावकऱ्यांसोबत आला आणि जमावाने राव यांची कार रोखली. राव यांचे खासगी सुरक्षा अधिकारी आणि माजी आमदार सोमू कारबाहेर आले असता त्यांनी एके-४७ रायफलीतून गोळ्या झाडल्या. राव आणि सोमू यांचा जागीच मृत्यू झाला. तत्पूर्वी त्यांनी सुरक्षा अधिकाºयांना नि:शस्त्र केले होते. माओवादी आंध्र-ओडिशा सीमा समितीचे सचिव रामकृष्ण यांच्या नेतृत्वात सुमारे ५० ते ६० दहशतवादी हल्ल्यात सहभागी असावेत, असा अंदाज विशाखापट्टणमचे पोलीस उपमहानिरीक्षक सी.श्रीकांत यांनी वर्तवला आहे.मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू न्यूयॉर्कमध्ये असून, त्यांनी विशाखापट्टणमचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांशी दूरध्वनीवर संपर्क साधून या घटनेची माहिती मागितली आहे. उपमुख्यमंत्री (गृह) एन. चिना राजप्पा आणि पोलीस महानिरीक्षक (प्रभारी) हरीशकुमार गुप्ता यांनी घटनास्थळी भेट दिली.बॉक्साईट खाणींना होता विरोध....माओवाद्यांनी ‘नक्षल हुतात्मा सप्ताह’ आयोजित केल्यामुळे सतर्कता बाळगली असताना ही घटना घडली. आदिवासी पट्ट्यात बॉक्साईट खाणींचे काम पुन्हा सुरू करण्याला नक्षलवाद्यांचा विरोध होता. ग्रेनाईटच्या उत्खननावरून निर्माण झालेल्या वादात आमदार राव यांचा सहभाग होता, अशी माहिती समोर आली आहे.जमावाने दोन पोलीसठाणी जाळली...दरम्यान, आमदार राव यांच्या हत्येच्या निषेधार्थ संतप्त जमावाने अराकू आणि डुमरिगुडा पोलीस ठाण्यांना आग लावली.पोलिसांच्या निष्क्रियतेमुळेच माओवाद्यांनी हिंसाचार केल्याचा आरोपही राव यांच्या असंख्य समर्थकांनी केला. त्यांच्या शेकडो समर्थकांनी अराकू पोलीसठाण्यात घुसून आग लावल्याने दस्तऐवज जळून खाक झाले. तेथील फर्निचरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जमावाच्या उग्र रूपामुळे पोलिसांनी सुरक्षितस्थळी धाव घेतली. डुमरिगुडा पोलीसठाण्याचे जाळपोळीत मोठे नुकसान झाले आहे.

टॅग्स :Andhra Pradeshआंध्र प्रदेशnewsबातम्या