सूरत : हिरे व्यापारी केयूर मियानी आणि आकाश सलिया यांनी 1998 मध्ये त्यांच्या आजोबांनी खरेदी केलेल्या कच्च्या हिऱ्यामधून 1.48 कॅरेटच्या भागाला भारताचा नकाशाचा आकार दिला आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे चित्र काढले आहे.
नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर लोकांनी विविध माध्यमांद्वारे प्रेम व्यक्त केले आहे. हिऱ्यामध्ये मोदींचे छायाचित्र कोरण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी लागला आहे. हा हिरा 1.48 कॅरेटचा असून सध्या त्याची किंमत 10 हजार डॉलर म्हणजेच सात लाख रुपये आहे. त्यांच्या आजोबांनी हा हिरा खरेदी केला तेव्हा त्याची किंमत 45 हजार रुपये होती.
लेझर इन्स्क्रिप्शन टेक्नॉलॉजीद्वारे डायमंडवर नरेंद्र मोदी यांची प्रतिकृती बनविण्यात आली आहे. यासाठी तीन महिने लागलेत. मियानी यांनी सांगितले की मोदी यांच्या बेटी बचाओ, स्वच्छता अभियान आणि अन्य योजनांपासून प्रभावित होऊन हिऱ्यावर त्यांचे चित्र काढले आहे. हा हिरा पंतप्रधानांना भेट देण्यात येणार आहे.