मारनबंधूंना हायकोर्टाकडे जाण्याची मुभा नाही
By admin | Published: February 10, 2015 12:55 AM
नवी दिल्ली : सवार्ेच्च न्यायालयाने सोमवारी द्रमुकचे नेते दयानिधी मारन आणि त्यांचे बंधू कलानिधी यांना दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्यास परवानगी नाकारली आहे. या दोघांनी एअरसेल-मॅक्सिस सौद्याबाबत विशेष सीबीआय न्यायालयाने पाठविलेल्या समन्सला आव्हान देण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात जाण्याची परवानगी त्यांनी मागितली होती.
नवी दिल्ली : सवार्ेच्च न्यायालयाने सोमवारी द्रमुकचे नेते दयानिधी मारन आणि त्यांचे बंधू कलानिधी यांना दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्यास परवानगी नाकारली आहे. या दोघांनी एअरसेल-मॅक्सिस सौद्याबाबत विशेष सीबीआय न्यायालयाने पाठविलेल्या समन्सला आव्हान देण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात जाण्याची परवानगी त्यांनी मागितली होती.सीबीआयच्या न्यायालयात २ जी स्पेक्ट्रम घोटाळ्याच्या तपासासाठी विशेष न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली असून एअरसेल- मॅक्सिस सौदा या घोटाळ्याचा भाग नसल्यामुळे विशेष न्यायाधीश सुनावणी करू शकत नाही, हे तुमचे म्हणणे विशेष न्यायालयातच मांडा असा आदेश न्या. व्ही. गोपालगौडा आणि आर. बनुमथी यांच्या खंडपीठाने दिला. याचिकाकर्त्याने न्यायालयीन अखत्यारिचा मुद्दा उपस्थित केला असून आम्ही मारनबंधूंना दिल्ली उच्च न्यायालयात बाजू मांडण्याची मुभा देऊ शकत नाही, असे खंडपीठाने नमूद केले.