शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
3
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
4
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
5
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
6
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
7
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
8
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
9
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
10
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
11
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
12
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

मराठा लाइट इन्फन्ट्री @ २५० ; अतुलनीय शौर्यगाथा,  छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श, वर्षभर होणार अनेक कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2018 5:56 AM

छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानणा-या व मराठ्यांच्या युद्धकौशल्याची शौर्यगाथा त्रिखंडात दुमदुमत ठेवणाºया ‘मराठा लाइट इन्फन्ट्री’ या लष्करातील सर्वात जुन्या सैन्यदलास शनिवारी २५० वर्षे पूर्ण झाली. या रेजिमेंटच्या द्विशतकोत्तर सुवर्ण महोत्सवानिमित्त वर्षभर कार्यक्रम होणार आहेत.

नवी दिल्ली : छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानणा-या व मराठ्यांच्या युद्धकौशल्याची शौर्यगाथा त्रिखंडात दुमदुमत ठेवणाºया ‘मराठा लाइट इन्फन्ट्री’ या लष्करातील सर्वात जुन्या सैन्यदलास शनिवारी २५० वर्षे पूर्ण झाली. या रेजिमेंटच्या द्विशतकोत्तर सुवर्ण महोत्सवानिमित्त वर्षभर कार्यक्रम होणार आहेत.या रेजिमेंटचे प्रमुख (कर्नल) लेफ्ट. जनरल पी. जे. एस. पन्नू यांनी सांगितले की, दिल्लीत रविवारी होणाºया कार्यक्रमाने रेजिमेंटच्या २५१ व्या वर्षातील पदार्पणाची सुरुवात होईल. या कार्यक्रमात मराठा लाइट इन्फन्ट्रीची अभिमानास्पद शौर्यगाथा विषद करणाºया ‘व्हिक्टरी अँड व्हेलॉर’ या सचित्र ग्रंथाचे प्रकाशन होईल.युद्धभूमीवर अत्यंत चपळ हालचाली ही ओळख असलेले हे सैन्यदल ब्रिटिश काळापासून ‘लाइट इन्फन्ट्री’ चा दर्जा मिळालेली पहिली रेजिमेंट आहे, असे सांगून जनरल पन्नू म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आदर्श आहेत. ‘कर्तव्य, सन्मान, धैर्य’ हे आमचे ध्येय आहे आणि ‘बोल श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय’ ही युद्धघोषणा आहे. गनिमी युद्धातील मराठा योद्ध्यांचे कौशल्य हे स्फूर्तिस्थान आहे. जनरल पन्नू म्हणाले की, आमची रेजिमेंट नौदलाच्या ‘आयएनएस मुंबई’ युद्धनौकेशी व हवाईदलाच्या २० व्या स्क्वाड्रनशी (सुखोई) संलग्न आहे. सध्याच्या नौदल प्रमुखांनी व नौदल उपप्रमुखांनी पूर्वी ‘आयएनएस मुंबई’चे अधिपत्य केलेले असल्याने तेही सोहळ््यात सहभागी होतील, अशी अपेक्षा आहे. कर्नाटकमधील बेळगाव येथे या रेजिमेंटचे मुख्यालय आहे.चार अशोकचक्रांसह ३२० शौर्य पदकेस्थापना सन १७६८. मुंबई बेटांवरील ईस्ट  इंडिया कंपनीच्या मालमत्तांच्या रक्षणासाठी ‘बॉम्ब शिपाई’ दलाची दुसरी फलटण म्हणून.दोन व्हिक्टोरिया क्रॉस (नाईक यशवंत घाडगे व शिपाई नामदेव जाधव-दुसरे महायुद्ध) व चार अशोकचक्रांसह (कॅ. एरिक टकर, कर्नल एन. जे. नायर, कर्नल वसंत वेणुगोपाळ आणि लेफ्ट. नवदीप सिंग) एकूण ३२० शौर्य पदकेव युद्ध पदके.पहिल्या महायुद्धात मोसापोटेमिया आघाडीवरील विजयात सिंहाचा वाटा. दुसºया महायुद्धात दक्षिण आशियाई आघाडी, उत्तर आफ्रिका व इटलीमधील युद्धआघाड्यांवर अजोड पराक्रम.गोवामुक्ती व हैदराबाद मुक्तीसह स्वातंत्र्यानंतरच्या प्रत्येक युद्धात शौर्याची पराकाष्ठा. या रेजिमेंटचे अधिकारी जनरल जे. जे. सिंग सन २००५ मध्ये देशाचे लष्करप्रमुख झाले.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवान