मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. हा जगातील सर्वात उंच पुतळा साकारण्यासाठी मराठमोळ्या शिल्पकाराची मदत घेतली. तसेच लोकार्पण सोहळ्यावेळी छत्रपती शिवरायांचे नावही मोदी यांनी घेतले खरे, परंतु पुतळ्याच्या खाली देश-विदेशातील भाषांमध्ये लिहिलेल्या पाटीवर मराठीचा विसर पडल्याचे दिसत आहे.
केवडीया येथे नर्मदा नदीवर सरदार वल्लभभाई पटेल यांचा 182 मीटर उंचीचा पुतळा उभारण्यात आला आहे. ऐक्याचे प्रतीक (स्टॅच्यू ऑफ युनिटी) असे या पुतळ्याचे वर्णन मोदी यांनी करताना शिवरायांशी तुलना केली. मात्र, गुजरातला मराठीचे वावडे असल्याचे दिसत आहे. हा पुतळा मराठमोळे शिल्पकार राम सुतार यांनी साकारला आहे.
महत्वाचे म्हणजे मोदी यांनी भाषणावेळी शिवरायांचा उल्लेख करून सरदार वल्लभभाई पटेल यांच्यामध्ये शिवरायांचे शौर्य होते, असा उल्लेख केला.