योगेश पांडे
नागपूर : छत्तीसगड विधानसभा निवडणुकांच्या दुसऱ्या टप्प्यातील ७२ जागांवरील निवडणुकांसाठी काँग्रेस, भाजपासह महाराष्ट्रातील शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसनेदेखील उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. सोबतच ‘आप’नेदेखील सुशिक्षित भागामध्ये आपले वेगळे आव्हान उभे केले आहे.
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या अंतिम यादीनुसार ७२ जागांसाठी १,०७८ उमेदवार रिंगणात आहेत. काँग्रेस व भाजपाने सर्वच जागांवर उमेदवार उभे केले आहेत. तर बहुजन समाज पक्ष, अजित जोगीप्रणीत छत्तीसगड जनता काँग्रेस व भाकपा यांच्या महाआघाडीनेही ७२ जागांवर उमेदवार उभे केले आहेत. दोन ते तीन जागांवर या तिन्ही पक्षांचे उमेदवार वेगवेगळे उभे झाले आहेत. यंदा शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनीदेखील राष्ट्रीय तसेच स्थानिक पक्षांसमोर आव्हान उभे केले आहे. शिवसेनेने ३३, राष्ट्रवादीने १२ उमेदवार मैदानात उतरवले आहेत. मात्र मराठी चेहºयांचे प्रमाण त्यात फारच कमी आहे. २०१३ साली राष्ट्रवादीचे १४ उमेदवार रिंगणात होते. यातील ४ उमेदवार हे संबंधित विधानसभा क्षेत्रात पहिल्या पाच उमेदवारांमध्ये होते. तर शिवसेनेने २७ ठिकाणी उमेदवार उभे केले होते व त्यांचे तीन उमेदवार हे पहिल्या पाचमध्ये निवडून आले होते. २०१३ च्या निवडणुकांत राष्ट्रवादी तसेच शिवसेनेने जोरदार प्रचार केला होता. मात्र त्या तुलनेत त्यांच्या हाती यश लागले नव्हते. शिवसेनेला एकूण मतांच्या तुलनेत अवघी ०.२९ टक्के मते मिळाली होती, तर राष्ट्रवादीच्या वाट्याला ०.३० टक्के मते आली होती. राज्यात मराठी मतदारांची संख्या मोठी आहे. विशेषत: रायपूर, भिलाई, बिलासपूर येथे अनेक पट्ट्यांमध्ये मराठी भाषिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे हे विशेष.पक्षनिहाय उमेदवारांची संख्याकाँंग्रेस ७२भाजपा ७२बसपा २७छत्तीसगड जनता कॉंग्रेस ४७शिवसेना ३३राष्ट्रवादी १२आप ६७गोंडवाना गणतंत्र पक्ष ३६अपक्ष ४९२इतर २२०‘स्टार’ प्रचारकांमध्ये कोणराष्ट्रवादी : राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, प्रफुल्ल पटेल, डी.पी.त्रिपाठी, सुनील तटकरे, छगन भुजबळ, सुप्रिया सुळे इत्यादींची नावे आहेत.शिवसेना : पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, केंद्रीय मंत्री अनंत गीते, सुभाष देसाई, संजय राऊत इत्यादींची नावे आहेत.