मुंबई/नवी दिल्ली : अत्यंत मानाच्या ६६व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा झाली असून, ‘भोंगा’ हा सर्वोत्तम मराठी चित्रपट ठरला आहे, तर आयुष्मान खुराणा, तब्बू आणि राधिका आपटे यांची मध्यवर्ती भूमिका असलेल्या ‘अंधाधुन’ या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा बहुमान मिळवला आहे.शिवाजी लोटन पाटील दिग्दर्शित आणि निर्मित ‘भोंगा’ सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरला आहे. ‘नाळ’ चित्रपटातील बालकलाकार श्रीनिवास पोफळे याने सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार जिंकला आहे. ‘नाळ’साठी सुधाकर रेड्डी यंकट्टी यांनी सर्वोत्कृष्ट नवोदित दिग्दर्शकाचा पुरस्कार पटकावला आहे. अभिनेता स्वानंद किरकिरे याने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याच्या (चुंबक) पुरस्कारावर नाव कोरले आहे.अंदाधुन, उरी द सर्जिकल स्ट्राईकचा दबदबाहिंदीत अंधाधुनला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला असून, त्यातील आयुष्यमान खुराणा आणि ‘उरी- द सर्जिकल स्ट्राईक’ मधील विकी कौशल या दोघांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला आहे. उरीसाठी दिग्दर्शक आदित्य धर यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार पटकावला आहे.पॅडमॅन हा सामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला असून बधाई हो ने सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपटाचा पुरस्कार मिळवला आहे. यंदा लोकसभा निवडणुकीमुळे पुरस्कारांची घोषणा उशिरा झाली.
सर्वोत्कृष्ट चित्रपटमराठी - भोंगा, गुजरातील- इल्लारूहिंदी - अंधाधुनराजस्थानी - टर्टलउर्दू - हमीद,मल्याळम - नायजेरियातेलगू - महन्ती, तामिळ -बारमआसामी- बिलबुल कॅन सिंगपंजाबी - हारजीतासर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शक- कृती महेश मिद्या व ज्योती तोमर (‘पद्मावत’ चित्रपटातील घूमर गाण्यासाठी)संगीत दिग्दर्शक-संजय लीला भन्साळी (पद्मावत)साऊंड डिझायनर- उरीअॅक्शन चित्रपट- केजीएफलोकप्रिय चित्रपट- बधाई होभूमिकासामाजिक चित्रपट- पॅडमॅनपर्यावरणविषयक चित्रपट- पाणीसहाय्यक अभिनेता- स्वानंद किरकिरे (चुंबक)सहाय्यक अभिनेत्री- सुरेखा सिक्री(बधाई हो)पार्श्वगायक-अरिजीत सिंग (‘पद्मावत’मधील बिंते दिल गाण्यासाठी)