ऑलाइन लोकमत
अहमदाबाद, दि. ९ - नीरज ग्रोव्हर हत्याप्रकरणी तीन वर्षांचा कारावास भोगून बाहेर आलेली कन्नड अभिनेत्री मारिया सुसराज हिला आज पुन्हा अटक करण्यात आली आहे. मात्र या अटकेचा नीरज ग्रोव्हर प्रकरणाशी संबंध नाहीये, तर हज यात्रेकरूंना दोन कोटींचा गंडा घातल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली.
तुरंगातून बाहेर आल्यानंतर ३५ वर्षीय मारियाने काही महिन्यांपूर्वी आपली बिझनेस पार्टनर पारोमिता चक्रवर्तीसह एक एअर तिकीट बूकिंग एजन्सी उघडली होती. त्याअंतर्गत त्या दोघींनी हज यात्रेकरूंसाठी तिकीटेही बूक केली. मात्र काही काळांनतर त्यांनी ती तिकीटे रद्द करत रिफंडचे २.६८ कोटी रुपये लाटले. हजची तिकीटे रद्द केल्याचा सुगावा त्यांनी त्या यात्रेकरूंना बिलकूल लागू दिला नाही. मात्र काही दिवसांनी प्रकार लक्षात आल्यानंतर एका यात्रेकरून त्यांच्या विरोधात फसवमउकीची तक्रार दाखल केली आणि पोलिसांनी मारिया व पारोमिताचा शोध सुरू केला. अखेर आज अहमदाबाद क्राईम ब्रांचच्या अधिका-यांनी मारियाला अटक केली मात्र पारोमिता अद्यापही फरार असून तिचा शोध सुरू आहे.
२००८ साली घडलेल्यानीरज ग्रोव्हर हत्याप्रकरणात मारिया व तिचा मित्र जेरोमला अटक करण्यात आली होती. खुनाचे पुरावे नष्ट केल्याप्रकरणी मारियाला तीन वर्षांचा तुरूंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती.