यावल वन्यजीव अभयारण्यातील पक्षीग्णनत आढळला समुद्री बगळा
By admin | Published: December 23, 2015 11:58 PM
जळगाव- रविवार २० रोजी यावल वन्यजीव अभयारण्यात वन्यजीव विभागाने चातक निसर्ग संवर्धन संस्थेच्या मदतीने सुकी धरण जलाशयावर पक्षीगणना आयोजित केलेली होती. या गणनेत ७३ प्रजातीचे तीन हजाराच्यावर पक्षी आढळले.
जळगाव- रविवार २० रोजी यावल वन्यजीव अभयारण्यात वन्यजीव विभागाने चातक निसर्ग संवर्धन संस्थेच्या मदतीने सुकी धरण जलाशयावर पक्षीगणना आयोजित केलेली होती. या गणनेत ७३ प्रजातीचे तीन हजाराच्यावर पक्षी आढळले.पक्षीगणना संपल्यानंतर वन प्रशिक्षण केंद्राजवळील सुकी नदीत समुद्री बगळा खाद्य शोधतांना पक्षी अभ्यासक अनिल महाजन, समीर नेवे, संजय पाटील, उदय चौधरी, अशोक पाटील यांना आढळला. हा समुद्र बगळा मुख्यत्वे समुद्राकाठी आढळतो. जळगाव जिल्ात याची पहिलीच नोंद असावी. पक्षी गणनेत वन्यजीव पाल वन विभागाचे वनक्षेत्रपाल पी.बी.सोनवणे, वनपाल आर.व्ही.विभांडीक, मोरे, मनीषा जाधव, कल्पना पाटील, सुधीर पटणे, आर.एस.सोनवणे, आर.बी.पाटील वन मजूर तसेच चातक निसर्ग संवर्धन संस्थेचे पदाधिकारी सहभागी होते.