इन्फो..परिवर्तनची घोषणापरिवर्तन पॅनलचे नेते भाजपा नगरसेवक दिनकर पाटील यांनी त्याच्या पॅनलमधील १२ उमदेवारांच्या नावाची घोषणा केली. त्यात सर्वसाधारण सोसायटी गट- दिनकर धर्मा पाटील, उत्तम मुरलीधर बोराडे, नवनाथ महादू कोठूळे, भाऊसाहेब वाराजी ढिकले, तुकाराम दगडू शिंदे, शंकर रामभाऊ कसबे. महिला राखीव- अनिता रामदास चव्हाण, संगीता अशोक चव्हाण. ग्रामपंचायत गटातून - मधुकर गणपत खांडबहाले, दिलीप गंगाधर थेटे, निशा देवीदास पगार, हिराबाई शंकर वाघ आदिंचा समावेश असून, उर्वरित पाच उमेदवारांची शुक्रवारी नावे जाहीर करणार असल्याचे दिनकर पाटील यांनी सांगितले.इन्फो..सेनेत फूटशिवसेनेचे माजीमंत्री बबनराव घोलप यांनी शेतकरी विकास पॅनलची घोषणा केलेली असली तरी प्रत्यक्षात सहकारात पक्षाला काही महत्त्व नसते, असे बबनराव घोलप यांनी मागील आठवड्यात नाशिकला आलेल्या संपर्कप्रमुख आमदार अजय चौधरी यांना सांगितले होते. प्रत्यक्षात त्याचा प्रत्ययच घोलप यांना येत असून, सेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांच्यासह पेठ तालुकाप्रमुख भास्कर गावित यांनी माजी खासदार देवीदास पिंगळे यांच्या पॅनलशी सोबत केली आहे. करंजकर यांचे समर्थक आत्माराम दाते व भास्कर गावित यांचे चिरंजीव श्याम गावित यांनाच उमेदवारी देऊन पिंगळेंनी सेनेत नियोजनबद्ध फूट पाडल्याची चर्चा आहे. इतकेच नव्हे तर आपलं पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ श्रीफळ वाढवून करण्यासाठी सेनेचे खासदार हेमंत गोडसे येणार असल्याचा दावाही पिंगळे यांनी केला आहे. त्यामुळे बबनराव घोलप यांच्या जोडीला आमदार योगेश घोलप, जगन आगळे, प्रकाश घुगे आदि सेनेचे पदाधिकारी असल्याचे चित्र आहे.
बाजार समिती बातमी जोड
By admin | Published: July 09, 2015 10:47 PM