शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
2
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
3
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
4
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
5
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
6
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
7
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
8
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
10
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
11
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
12
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
13
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
14
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
15
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
16
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
17
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
18
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
19
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
20
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...

मार्केट लिलावाच्या ठरावास विरोध व्यापारी पोहोचले जगवाणींच्या निवास्थानी: रविवारी पालकमंत्र्यांची घेणार भेट

By admin | Published: January 31, 2016 12:15 AM

जळगाव : मनपाच्या मालकीच्या जागेवरील १४ मार्केटमधील गाळ्यांच्या ऑनलाईन (ई-निविदा) पद्धतीने लिलावाचा ठराव बुधवारी झालेल्या विशेष महासभेत मंजूर करण्यात आला होता. लिलावाच्या या पद्धतीस विरोध दर्शवत मार्केटमधील व्यापारी सकाळी ११.३० वाजता आमदार डॉ. गुरुमुख जगवाणी यांच्या निवास्थानी पोहोचले. याप्रश्नी रविवारी पालकमंत्री एकनाथराव खडसे यांना भेटून निवेदन देण्याचा निर्णय व्यापार्‍यांनी घेतला.

जळगाव : मनपाच्या मालकीच्या जागेवरील १४ मार्केटमधील गाळ्यांच्या ऑनलाईन (ई-निविदा) पद्धतीने लिलावाचा ठराव बुधवारी झालेल्या विशेष महासभेत मंजूर करण्यात आला होता. लिलावाच्या या पद्धतीस विरोध दर्शवत मार्केटमधील व्यापारी सकाळी ११.३० वाजता आमदार डॉ. गुरुमुख जगवाणी यांच्या निवास्थानी पोहोचले. याप्रश्नी रविवारी पालकमंत्री एकनाथराव खडसे यांना भेटून निवेदन देण्याचा निर्णय व्यापार्‍यांनी घेतला.
मनपा मालकीच्या काळ्यांबाबत निर्णयासाठी गेल्या बुधवारी विशेष महासभा झाली होती. मनपा कालकीच्या शहरातील विविध भागात असलेल्या १४ गाळ्यांच्या विषयावर सविस्तर चर्चा होऊन या गाळ्यांच्या ऑनलाईन (ई-निविदा) पद्धतीने लिलावाचा ठराव विशेष महासभेत मंजूर करण्यात आला. त्यासाठी यापूर्वी मंजूर केलेल्या ठराव क्र.१३५ मध्ये नगररचना विभागाने रेडिरेकनरच्या वेटेड दराने काढलेली किंमत हीच बेस व्हॅल्यू (लिलावाच्या बोलीची किंमत) धरली जाणार आहे.
व्यापारी एकवटले
या ठरावाविरोधात आता व्यापारी एकवटले आहेत. सकाळी ११.३० वाजेच्या दरम्यान छत्रपती शाहू मार्केट मधील व्यापारी संघटचे अध्यक्ष डॉ. शांताराम सोनवणे, फुले मार्केट असो. चे रमेश मताणी, राजस कोतवाल, तेजस देपुरा, चौबे मार्केट असो.चे अशोक बारी, भास्कर मार्केटचे संजय पाटील यांच्यासह विविध संघटनांची पदाधिकारी आमदार डॉ. गुरुमुख जगावणी यांच्या निवास्थानी गेले होते.
१० मार्केटच्या विषयावर चर्चा
शहरातील १० व्यापारी संकुले अशी आहेत की तेथे फारसा व्यापारही नाही. रामलालजी चौबे मार्केट, भोईटे मार्केट, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्केट, छत्रपती शाहू मार्केट, शिवाजीनगर रुग्णालयाजवळील दुकाने, भास्कर मार्केट, लाठी शाळेतील हॉल, नानीबाई अग्रवाल मार्केट, श्यामाप्रसाद उद्यानाजवळील मार्केट, जुने शाहू मार्केट या व्यापारी संकुलांबाबत ठराव क्रमांक १३५ मध्ये उल्लेख आहे की ही संकुले सामाजिक दृष्टीने बांधण्यात आली आहेत. अत्यंत छोट्या व हातावर काम करणार्‍या गाळेधारकांचा यात समावेश आहे. त्यामुळे या मार्केटचा समावेश अव्यावसायिक गटात करण्यात यावा. मनपा ठरवेल त्यानुसार त्यांना स्थान निहाय सूट देण्यात देण्याचे या ठरावात नमूद होते. या संकुलांचाही नव्या ठरावात काही उल्लेख नसल्याचे यावेळी डॉ. शांताराम सोनवणे यांनी लक्षात आणून दिले. नव्या ठरावांची अंमलबजावणी झाल्यास हे व्यावसायिक उद्ध्वस्त होतील असेही ते म्हणाले.
-----