शहरं
Join us  
Trending Stories
1
बाळासाहेब थोरातांच्या हाती राज्याचे अधिकार द्यायला हवे; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
2
IND vs SA 3rd T20: टीम इंडियाने पुन्हा केली तीच 'आयडिया'! तिलकने खेळ थांबवला अन् आफ्रिकेचा 'गेम' झाला!!
3
इस्रायलचा बेरूतमध्ये मोठा हवाई हल्ला, अनेक इमारतींचे नुकसान, सात मुलांसह २३ जणांचा मृत्यू
4
'शक्तिमान'साठी मुकेश खन्नांनी रणवीर सिंहला केला होता विरोध; म्हणाले, "तो दोन तास..."
5
घसरणीच्या सत्रांनंतर अखेर शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स-निफ्टी वधारला; मिडकॅप-स्मॉलकॅप मध्ये खरेदी
6
अमित ठाकरे यांना मतदान का करावे? ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितले 'हे' 10 मुद्दे
7
मुंबईत मोदींच्या सभेसाठी वाहतूक मार्गात बदल; निवडणुकीसाठी काही रस्त्यांवर सहा दिवस नो पार्किंग!
8
भाजपाचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
9
...तर त्यांच्या कानाखाली फटाके वाजवा, भाषण करताना राज ठाकरे संतापले, कारण काय?
10
"सरकार पाडण्यासाठी आमदारांना ५० कोटींची ऑफर...", मुख्यमंत्र्यांचा भाजपवर आरोप
11
आजचे राशीभविष्य - १४ नोव्हेंबर २०२४, सगळ्या कामात यश मिळाल्याने खूप आनंदी आणि प्रसन्न व्हाल
12
भाजपकडून माझा बुथ, सर्वात मजबूत अभियान, नरेंद्र मोदी साधणार महाराष्ट्रातील १ लाख बुथ प्रमुखांशी संवाद
13
विशेष लेख: न्या. चंद्रचूड मानवी हक्क आयोगाचे नवे अध्यक्ष?
14
कोण आहेत कॅनडातील सर्वात श्रीमंत भारतीय, ज्यांना जगही म्हणतं कॅनडियन वॉरन बफे; पद्मश्रीनंही झालाय सन्मान
15
आजचा अग्रलेख: 'बुलडोझर'ला ब्रेक...
16
धक्कादायक! जळगावात गरोदर महिलेला घेऊन जाणाऱ्या ॲम्बुलन्समध्ये ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट; १५० फूट उंच उडाल्या चिंधड्या
17
शिवाजी पार्कवर आवाज कुणाचा?; १७ नोव्हेंबरला सभेसाठी मनसेला मंजुरी मिळण्याची शक्यता
18
मुंबईत प्लास्टिकच्या डब्यात तुकडे करून टाकलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले; प्रेमसंबंधाच्या विरोधातून हत्या!
19
नागपुरात कार्यकर्तेच बनले फडणवीसांच्या प्रचार मोहिमेचे सारथी
20
मार्कोची फास्टर फिफ्टी; पण शेवटी सूर्याची सेना जिंकली! आता फक्त टीम इंडियालाच मालिका विजयाची संधी

महाराष्ट्रातील ‘त्या’ प्रकल्पांवर भाजपचे गुजरातमध्ये मार्केटिंग!रोजगार निर्मितीसाठी देताहेत वेदांता-फॉक्सकॉनचे उदाहरण

By कमलेश वानखेडे | Published: November 23, 2022 10:16 AM

राजकोटमध्ये विकास या मुद्द्यावर भाजपची पकड घट्ट झाल्याचे दिसून येते. पण त्या विकासाचे वाटेकरी होऊ शकलो नाही, अशी नाराजी तरुण उघडपणे बोलून दाखवितात. नेमका हाच मुद्दा काँग्रेसने हेरला आहे.

राजकोट : बेरोजगारीच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुजरातेत भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला असताना दुसरीकडे भाजपने महाराष्ट्रातून गुजरातमध्ये आणलेल्या उद्योगांचे मार्केटिंग सुरू केले आहे. भाजपचे प्रचारक, पदाधिकारी व कार्यकर्ते वेदांता-फॉक्सकॉनसह टाटा समूहाच्या एअरबस प्रकल्पामुळे कशी रोजगारनिर्मिती होणार आहे, हे युवकांना पटवून देण्याच्या कामी लागले आहेत.राजकोटमध्ये विकास या मुद्द्यावर भाजपची पकड घट्ट झाल्याचे दिसून येते. पण त्या विकासाचे वाटेकरी होऊ शकलो नाही, अशी नाराजी तरुण उघडपणे बोलून दाखवितात. नेमका हाच मुद्दा काँग्रेसने हेरला आहे. राहुल गांधी यांनी राजकोटच्या सभेत बेरोजगारी व बंद पडलेल्या छोट्या उद्योगांवर बोट ठेवत तरुणाईला साद घातली; तर आपनेही भाजपची नेमकी हीच दुखती नस दाबली आहे.

तरुण का आहेत नाराज?लोकमत प्रतिनिधीने राजकोटच्या युवकांशी चर्चा केली असता बहुसंख्य युवक बेरोजगारीच्या मुद्द्यावर नाराज असल्याचे दिसून आले.गेल्या काही वर्षांत शासकीय नोकरभरती झाली नाही. नोकरीसाठी अर्ज मागविले तर परीक्षा झाली नाही. परीक्षा घेतली तर पेपर फुटला. निकाल लागले तर मुलाखती झाल्या नाहीत. ज्यांच्या मुलाखती झाल्या त्यांना नियुक्तिपत्र मिळाले नाही.तलाठ्यांच्या तीन हजारांवर जागा निघाल्या होत्या. त्यासाठी तीन लाखांवर अर्ज आले होते. यावरून सुशिक्षित बेरोजगारांची संख्या किती वाढली आहे, अशी आकडेवारी युवकच मांडत आहेत. सौराष्ट्रच्या भागात गेल्या पाच वर्षांत मोठा उद्योग उभारण्यात आलेला नाही. किमान त्यावर तरी भाजपने लक्ष द्यायला हवे होते, अशी तरुणांची अपेक्षा आहे.

नावात गांधी आहे तर गांधींचा विचार समजा : सुधांशू त्रिवेदी- महात्मा गांधी यांनी स्वत:च्या वृत्तपत्रात वीर सावरकर यांच्यावर लेख लिहिला होता. त्यात त्यांनी सावरकरांबाबत बहादूर, चतुर व देशभक्त असा गौरव केला होता. त्यामुळे नावात गांधी असणाऱ्यांनी किमान गांधींनी लिहिलेले तरी वाचावे व त्यांचा विचार समजून घ्यावा, असा चिमटा भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत राहुल गांधी व तुषार गांधी यांना काढला.

- त्रिवेदी म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकोटला एम्स, आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारले. सहापदरी महामार्गाने जोडले. सरदार सरोवर प्रकल्प पूर्ण करून सौराष्ट्रची तहान भागवली. मात्र, २० वर्षे ज्यांनी तहानलेल्या गुजरातचे पाणी रोखून धरले, त्यांना सोबत घेऊन राहुल गांधी चालले. त्यामुळे आता गुजरातची जनताच काँग्रेसला ‘औकात’ दाखवेल, अशी टीकाही त्यांनी केली.

टॅग्स :Gujarat Assembly Election 2022गुजरात विधानसभा निवडणूक 2022BJPभाजपाcongressकाँग्रेसEmployeeकर्मचारी