लग्नामध्ये नवऱ्याकडील मंडळी हुंड्याची मागणी करतात. तसेच हुंड्याची मागणी पूर्ण न झाल्यास लग्न मोडतात, याची अनेक उदाहरणं तुम्ही पाहिलं असेलच. आता हुंडाबंदीच्या कायद्यामुळे याबाबतचे व्यवहार गुपचूपपणे होतात. मात्र नवरीने हुंड्याची मागणी करून ती पूर्ण न झाल्याने लग्न मोडल्याचं तुम्ही कधी ऐकलंय का? नाही ना. मात्र हैदराबादमध्ये असा आश्चर्यजनक आणि धक्कादायक प्रकार घडला आहे. इथे एका नवरीने वराकडील मंडळी हुंड्यात मागितलेली रक्कम देऊ शकली नाही, म्हणून लग्न मोडल्याचा प्रकार समोर आला आहे.
प्रसारमाध्यमांमध्ये येत असलेल्या वृत्तानुसार तेलंगाणामधील आदिवासी समाजामध्ये एक खास प्रकारची परंपरा आहे. येथे वर पक्षातील लोक हुंडा घेतात, पण वधूपक्षाकडूनही हुंड्याची मागणी होते. या प्रथेला उलटा हुंडा असं म्हणतात. या वधूने आपल्या जमातीमधील वराकडे दोन लाख रुपये हुंड्याची मागणी केली होती. वराच्या कुटुंबीयांनीही त्यासाठी हमी भरली होती. तसेच त्याव लग्नासाठी पैसे दिले होते. वराच्या कुटुंबीयांनी हैदराबादच्या बाहेरील भागामध्ये ९ मार्चला होणाऱ्या लग्नाची सर्व तयारी केली होती. मात्र ऐनवेळी नवरी लग्नाच्या मंडपात पोहोचलीच नाही.
जेव्हा वधू आणि तिचे नातेवाईक लग्नाच्या मंडपात पोहोचले नाहीत, तेव्हा वर पक्षातील मंडळी वधू आणि तिचे कुटुंबीय जिथे राहत होते तिथे पोहोचले. जेव्हा त्यांनी विचारणा केली, तेव्हा नवरीच्या कुटुंबीयांनी सांगितले की, नवरीला आणखी हुंडा हवा आहे. तो मिळाल्यावरच ती लग्न करेल. त्यानंतर नवऱ्याच्या कुटुंबाने पोलिसांशी संपर्क साधला. तसेच वधूच्या कुटुंबाला याबाबत चर्चा करण्यासाठी बोलावले. मात्र नवरी आपल्या मागणीवर ठाम होती. त्यामुळे दोन हजार रुपयेसुद्धा परत करण्यात आले. लग्न रद्द झाले. तसेच दोन्ही कुटुंब परस्पर सहमतीने या लग्नापासून वेगळी झाली.
पोलिसांनी सांगितले की, दोघांच्या कुटुंबांच्या सहमतीनंतर लग्न रद्द करण्यात आले. कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. तसेच दोन्ही बाजूंनी कुठलीही तक्रारही आलेली नाही. वधूने अधिक हुंड्याची मागणी केली होती. पण नवरीकडील मंडळी लग्नापर्यंत एवढा पैसा जमवू शकले नाहीत. त्यामुळे लग्न मोडण्यात आले. आता या नवरीला या लग्नात कुठलाही रस नव्हता, अशी बाब समोर आली आहे.