जोधपूर : राजस्थानच्या जोधपूरमध्ये राहणाऱ्या नरेश तिवानीचा विवाह पाकिस्तानच्या कराची शहरात राहणाऱ्या प्रिया बच्चानीशी ठरला. पण दोन देशांतील तणावामुळे त्यांना व्हिसा मिळत नव्हता. अखेर परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी दोघांनाही लग्नाची भेट दिली आणि वधू प्रिया बच्चानी आणि तिच्या कुटुंबाचा भारतात येण्याचा मार्ग मोकळा झाला.आधी ठरल्याप्रमाणे ७ नोव्हेंबरला नरेश व प्रिया विवाहबंधनात अडकणार होते. पण पाकिस्तानधील भारतीय दूतावासाकडून त्यांना व्हिसा मिळण्यात अडचणी येत होत्या. बरेच प्रयत्न करून, अखेर प्रियाने आपल्याला आणि कुटुंबियांना व्हिसा मिळत नसल्याची तक्रार प्रियाने ट्विटरद्वारे सुषमा स्वराज यांच्याकडे केली. आपल्यासहित ३५ नातेवाईकांना व्हिसा मिळावा असी विनंती तिने केली होती. सुषमा स्वराज यांनी मध्यस्थी करून देत प्रिया आणि तिच्या कुटुंबियांना व्हिसा मिळवून दिला आहे. सुषमा स्वराज यांनी केलेल्या मदतीबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत, असे नरेश म्हणाला. (वृत्तसंस्था)
कराचीच्या प्रियाला विवाहासाठी व्हिसा
By admin | Published: November 08, 2016 3:14 AM