बंगळुरू: मंगळाकडे झेपावलेल्या भारताच्या अंतराळ यानाने आपला ७५ टक्के प्रवास पूर्ण केला असून ते आता २४ सप्टेंबर रोजी मंगळाच्या कक्षेत प्रवेश करणार आहे. या यानाने आतापर्यंत सुमारे ५१० दशलक्ष कि.मी.चा प्रवास पूर्ण केला असल्याचे इस्रोने म्हटले आहे. ३०० दिवसांच्या या अंतराळ यात्रेपैकी या यानाने तीन चतुर्थांश एवढा प्रवास संपविला आहे.इस्रोने फेसबुकवर प्रसिद्ध केलेल्या माहितीत, या यानाचे एमओएम व त्याचे पेलोडस हे उत्तमरीत्या काम करीत आहेत. गेल्या जून महिन्याच्या ११ तारखेला इस्रोने या यानाची दिशा बदलून मंगळाकडे केली होती. अंतराळयानाच्या २२ प्रक्षेपकांना १६ सेकंद चालविण्यात आले होते. हे यान मंगळाच्या कक्षेत प्रवेश करण्याआधी इस्रो त्याच्या दिशेत अजून एकदा बदल करणार आहे. हा बदल आॅगस्ट महिन्याच्या अखेरीस केला जाईल. साडेचारशे कोटींच्या योजनेत यानाला मागील वर्षी ५ सप्टेंबर रोजी श्रीहरिकोटा येथून सोडण्यात आले होते.
मंगळ यानाचा ७५ टक्के प्रवास पूर्ण
By admin | Published: July 05, 2014 5:26 AM