झेंडू, शेवंतीला मागणी
By admin | Published: October 30, 2016 10:46 PM
पुणे : मार्केट यार्डातील फुलबाजारात झेंडू व चमेली यांसह सजावटीची फुले खरेदी करण्यासाठी रविवारी ग्राहकांची झुंबड उडाली होती. त्यामुळे काही प्रमाणात भाववाढ झाल्याचे व्यापार्यांनी सांगितले.
पुणे : मार्केट यार्डातील फुलबाजारात झेंडू व चमेली यांसह सजावटीची फुले खरेदी करण्यासाठी रविवारी ग्राहकांची झुंबड उडाली होती. त्यामुळे काही प्रमाणात भाववाढ झाल्याचे व्यापार्यांनी सांगितले.दिवाळीनिमित्त सध्या बाजारात फुलांना मागणी वाढली आहे. तसेच बाजारातही फुलांची आवक मुबलक प्रमाणात होत आहे. दोन दिवसांच्या तुलनेत रविवारी बाजारात झेंडूची आवक २० ते ३० टक्क्यांनी कमी झाली. मागील दोन दिवस झेंडूला चांगला भाव मिळाला नाही. अनेक शेतकर्यांनी बाजारात विक्रीसाठी फुले न आणता रस्त्यावर थांबून विक्री केली. रविवारीही सकाळीही हे चित्र पाहायला मिळाले. झेंडूला प्रति किलो ५ ते ४० रुपये भाव मिळाला. शेवंतीलाही विशेष मागणी असल्याने भावात काहीशी वाढ झाली असून प्रतिकिलो ४० ते ७० रुपये भाव मिळाला. जरबेरा, कार्नेशियन, गुलछडी या फुलांनाही चांगली मागणी होती.---------फुलांचे भाव (प्रतिकिलो) : झेंडू ५-३०, गुलछडी ८०-१५०, बिजली २०-३०, चमेली ६००-७००, शेवंती ४०-७०, कापरी १०-३०, सुा कागडा १५०-२५०, (चार गड्डीचे भाव) ऑस्टर १०-२०, (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी २०-४०, ग्लॅडिएटर २०-४०, डच गुलाब (२० नग) ६०-८०, लिलिबंडल (५० काडी) १५-२०, अबोली लड (पन्नास काडी) १००-१२०, जरबेरा २०-४०, कार्नेशियन १००-१५०. -------------------------------