शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
2
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
3
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
4
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
5
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
7
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
8
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
9
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
10
महानगरांमध्ये अघोषित पाणीबाणी लागू; तहान भागत नाही?, निमूट पैसे मोजा, टँकर मागवा!
11
अवघ्या ७७ चौरस फुटाच्या घरात राहते युवती; इवल्याशा खोलीनं संपवला जीवनातील संघर्ष
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

56 वर्षांनंतर सापडला हवाई दलातील शहीद जवानाचा मृतदेह; 23व्या वर्षी आलेले हौतात्म्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2024 14:52 IST

7 फेब्रुवारी 1968 रोजी घडलेल्या विमान अपघात 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.

सहारनपूर : जगात अनेकदा अशा घटना घडतात, ज्यावर विश्वास ठेवणे कठीण जाते. भारतीय सैन्यातील सैनिकांना हौतात्म्य आल्याच्या घटना तुम्ही अनेकदा ऐकल्या असतील. पण, आता एक अशी घटना समोर आली आहे, ज्यावर तुमचा विश्वास बसणार नाही. सियाचीनच्या ग्लेशियरजवळ भारतीय हवाई दलातील जवानाचा मृतदेह सापडला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या जवानाचा मृत्यू 56 वर्षांपूर्वी झालेला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सियाचीनमध्ये सापडलेला मृतदेह उत्तर प्रदेशातील सहारनपूर जिल्ह्यातील नानौता भागात राहणाऱ्या हवाई दलाच्या जवानाचा आहे. मलखान सिंग असे या जवानाचे नाव असून, 56 वर्षांपूर्वी विमान अपघातात या जवानाला हौतात्म्य प्राप्त झाले होते. आता इतक्या वर्षांनंतर त्या जवानाचा मृतदेह सापडल्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे. गुरुवारी(2 ऑक्टोबर) त्यांचे पार्थिव गावी दाखल झाले आणि कुटुंबीयांनी रीतिरिवाजानुसार त्यावर अंतिम संस्कार केले. आश्चर्याची बाब म्हणजे बर्फात गाडल्या गेल्याने मृतदेह खराब झालेला नव्हता.

मलखान सिंग शहीद झाले, तेव्हा ते अवघ्या 23 वर्षांचे होता. त्यांच्या पश्चात पत्नी शिलादेवी आणि दीड वर्षाचा मुलगा राम प्रसाद होता. मात्र, आता त्यांची पत्नी आणि मुलगा मरण पावल्यामुळे नातवाने त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. मलखान यांच्या मृत्यूनंतर शिलादेवीने मलखान यांचा धाकटा भाऊ चंद्रपाल यांच्याशी विवाह केला. पण, चंद्रपाल यांचाही मृत्यू झाला आहे. आता कुटुंबामध्ये मलखान यांचे नातू आहेत.

अपघाताच्या दिवशी काय झाले?7 फेब्रुवारी 1968 रोजी एएन-12 विमान चंदीगडहून उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच बेपत्ता झाले. रोहतांग खिंडीजवळ हवामान खराब झाल्यामुळे विमान क्रॅश झाले होते. यात 100 हून अधिक जवान शहीद झाले होते. हा बर्फाच्छादित पर्वतीय भाग असल्याने मृतदेह बाहेर शोधणे शक्य नव्हते. हे काम इतके अवघड आहे की, 2019 पर्यंत केवळ पाच मृतदेह सापडले. नुकतेच आणखी चार मृतदेह सापडले, त्यापैकी एक मलखान सिंग यांचा आहे.

टॅग्स :indian air forceभारतीय हवाई दलHimachal Pradeshहिमाचल प्रदेशAccidentअपघात