शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
2
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
3
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
4
सरपंच-उपसरपंचांच्या वेतनात वाढ, ग्रामसेवक पदाचं नाव बदललं; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
5
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
6
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
7
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
8
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
9
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य
10
लोकलमध्ये सापडली नोटांनी भरलेली बॅग, रक्कम पाहून पोलीसही अवाक्, तपास सुरू
11
“मिस्टर संभाजी भोसले, ही रयत तुम्हाला राजा मानणार नाही”; लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
12
तिरुपती बालाजी मंदिराचे शुद्धीकरण, भगवान व्यंकटेश्वर स्वामींची मागितली माफी
13
Airtel New Recharge Plans: एअरटेलनं लाँच केले ३ नवे प्लॅन्स; रिचार्ज करण्यापूर्वी एकदा पाहाच, काय आहे खास?
14
टीम इंडियानं पाडला बांगलादेशचा बुक्का; मग चव्हाट्यावर आला पाक क्रिकेटमधील 'मॅटर'; जाणून घ्या सविस्तर
15
"त्याला आवर घालायचे काम तुमच्याकडून..."; नितेश राणेंच्या भाषेवरून शरद पवार संतापले, भाजपाला सुनावले
16
युक्रेन युद्धादरम्यान रशियाला मोठा धक्का, चाचणीदरम्यान फुटलं महाक्षेपणास्त्र
17
तिरुपती लाडू वाद: सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल; तपास समिती स्थापन करण्याची मागणी
18
डेटिंग अ‍ॅपवरून ओळख, मुलावर जडलं प्रेम अन् एका फोनमुळे गमावले लाखो रुपये...
19
महिलांसाठी मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार?; नवी माहिती समोर
20
डॉक्टर व्हायचेय, पण बजेट २० लाख आहे, मग या देशात होऊ शकता MBBS

शहीद होण्यापूर्वी अधिकाऱ्याने काश्मीरमध्ये फडकावला तिरंगा

By admin | Published: August 17, 2016 4:40 AM

स्वातंत्र्यदिनानिमित्त केवढा तो उत्साह... श्रीनगरमध्ये तिरंगा फडकविताना केंद्रीय राखीव पोलीस दलातील कमांडिंग आॅफिसर प्रमोद कुमार यांची छाती

नवी दिल्ली : स्वातंत्र्यदिनानिमित्त केवढा तो उत्साह... श्रीनगरमध्ये तिरंगा फडकविताना केंद्रीय राखीव पोलीस दलातील कमांडिंग आॅफिसर प्रमोद कुमार यांची छाती अभिमानाने भरून आली होती. ‘आजचा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आहे’ हेच त्यांचे शेवटचे शब्द ठरले. कारण, झेंडावंदनांनंतर ते एका आॅपरेशनसाठी रवाना झाले आणि अतिरेक्यांशी लढताना झारखंडचा हा वीरपुत्र शहीद झाला. तत्पूर्वी दोन अतिरेक्यांचा खात्मा करुन कुमार यांनी आपले कर्तव्यही पूर्ण केले. प्रमोद कुमार यांना जुलै महिन्यातच बढती मिळाली होती आणि त्यामुळे त्यांची अन्यत्र बदली होणार होती. बदली न झाल्यामुळे ते श्रीनगरमध्ये कार्यरत होते. बदली वेळेत झाली असती, तर ते नक्कीच बचावले असते. त्यांच्या मुलीचा कालच वाढदिवस होता. त्यांच्या पत्नी नेहा यांच्या सांगण्यानुसार प्रमोद कुमार व नेहा यांचे काल सकाळी मोबाइलवर संभाषण झाले होते. आपण कामात व्यग्र आहोत, नंतर फोन करतो, असे ते पत्नीला म्हणाले होते. पुन्हा पत्नीने फोन केला, तेव्हा त्याच्या मोबाइलची बेल वाजत होती. पण मोबाइल बराच वेळ उचलला गेला नाही. त्यामुळे नेहा यांनी त्यांच्या सहकाऱ्यांशी मोबाइलवर संपर्क साधला, तेव्हा ते किरकोळ जखमी झाल्याचे त्यांना सांगण्यात आले. पुन्हा काही तासांनी फोन केला, तेव्हा त्यांच्यावर रुग्णालयात शस्त्रक्रिया सुरू असल्याची बातमी कळली. पण शस्त्रक्रियेनंतरही ते जगू शकले नाहीत.४४ वर्षीय कुमार यांनी सकाळी ८.३० च्या सुमारास झेंडा फडकावला. स्वातंत्र्याच्या ७० व्या वर्धापनदिनी सुरक्षा दलाची जबाबदारी वाढली आहे, असेही ते आपल्या या शेवटच्या भाषणात म्हणाले. १९९८ मध्ये ते नोकरीत रुजू झाले होते. सध्या ते केंद्रीय राखीव पोलीस दलात कमांडिंग आॅफिसर म्हणून कार्यरत होते. दरम्यान, झेंडावंदनानंतर नियंत्रण कक्षाला माहिती मिळाली की, नौहट्टा भागात अतिरेकी घुसले आहेत. ते तात्काळ एका बुलेटप्रूफ वाहनातून मोहिमेवर रवाना झाले. यावेळी त्यांचे काही सहकारीही सोबत होते. नौहट्टा भागात अतिरेक्यांशी झालेल्या चकमकीत त्यांच्या मानेच्या वरच्या बाजूला गंभीर इजा झाली. त्यांना तात्काळ सैन्याच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले; पण तेथे त्यांचा मृत्यू झाला. कुमार यांच्या पश्चात पत्नी नेहा आणि सातवर्षीय मुलगी आर्ना असा परिवार आहे. २०११, २०१४ आणि २०१५ मध्ये ‘सीआरएफकडून’ कुमार यांना विशेष कार्याबद्दल सन्मानित करण्यात आले होते. या चकमकीत अन्य नऊ जवान जखमी झाले आहेत. झारखंडच्या जमताडा जिल्ह्यात कुमार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.