शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारचा मोठा निर्णय; गायीला दिला 'राज्यमाते'चा दर्जा
2
"मोदींनी जितका पैसा अदानींना दिला, मी तितका गरिबांना देईन", राहुल गांधी काय बोलले?
3
मुस्लिमांची संख्या वाढलीय, आता तुमची सत्ता संपणार; सपा आमदाराच्या विधानानं नवा वाद
4
भारतात WANTED असलेला झाकीर नाईक पाकिस्तानात पोहोचला; 'या' मोठ्या शहरात घेणार सभा
5
अरे देवा! सलूनमध्ये 'फ्री हेड मसाज' पडला महागात; ३० वर्षीय तरुणाला आला स्ट्रोक अन्...
6
टेस्टमध्ये टीम इंडियाचा बेस्ट शो! धावांची 'बरसात' अन् फिफ्टी, सेंच्युरीसह जलद 'द्विशतकी' रेकॉर्ड 
7
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद कार्यालात तुफान राडा, ठाकरे गटाच्या शिवसैनिकांकडून बॉडीगार्ड्ना चोप 
8
Jio New Recharge Plan! दररोज १० रुपयांत मिळणार २ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंगही; कोणता आहे प्लॅन?
9
“मविआ १८० जागा जिंकेल, फडणवीसांनी महायुतीचा विरोधी पक्षनेता ठरवावा”: बाळासाहेब थोरात
10
"देवाला तरी राजकारणापासून दूर ठेवा", सुप्रीम कोर्टाने मुख्यमंत्री चंद्राबाबूंना झापले 
11
वर्षभरात अर्धी होतेय Smartphones ची किंमत; 'दिल मांगे मोअर'च्या नादात तुमचं मोठं नुकसान तर होत नाहीये ना?
12
अमेरिकेत जाणाऱ्यांसाठी खुशखबर! अमेरिकन दूतावास २.५ लाख अतिरिक्त व्हिसासाठी भेट देणार
13
फिल्मी क्वीनचा लक्झरी 'अंदाज'...! कंगना रणौतनं बंगला विकून काय केलं खरेदी? मोजले तब्बल 3 कोटी
14
जपानचे नवे पंतप्रधान चीनला शिकवणार धडा; नवा प्लॅन पाहून ड्रॅगनला बसणार धडकी!
15
विधानसभेसाठी तयारी झाली सुरू! शरद पवारांच्या भेटीसाठी नेत्यांची गर्दी, ठाकरेंच्या नेत्याने घेतली भेट
16
भाजपाला दिली २१ जागांची यादी, ३ महामंडळेही हवी; तिसऱ्या आघाडीवर रामदास आठवले म्हणाले...
17
प्रसिद्ध अभिनेता झाला शेतकरी, घेतलं १.५ कोटींचं कर्ज; मुलाच्या शाळेबाहेर विकावी लागली भाजी
18
टेस्टमध्ये टी-२० तडका! रोहित-यशस्वी जोडीनं सेट केला 'फास्टर फिफ्टी'चा रेकॉर्ड
19
अमेरिकेचा सीरियावर 'एअरस्ट्राइक'! हल्ल्यात ISIS, अल कायदाच्या ३७ दहशतवाद्यांचा खात्मा
20
संतापजनक! वडिलांची हत्या करून मुलांनी घरातच पुरला मृतदेह; ३० वर्षांनी उघड झालं रहस्य

मारुती, ह्युंदाईच्या कार विक्रीत वाढ; महिंद्रा, जीएमला फटकानवी

By admin | Published: December 02, 2014 12:08 AM

देशातील सगळ््यात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी इंडिया आणि ह्युंदाई मोटार इंडियाची नोव्हेंबर महिन्यातील विक्री उत्साहजनक वाढली,

दिल्ली : देशातील सगळ्यात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी इंडिया आणि ह्युंदाई मोटार इंडियाची नोव्हेंबर महिन्यातील विक्री उत्साहजनक वाढली, तर जनरल मोटार्सच्या विक्रीत तब्बल ३३.१ टक्क्यांची घट झाली. मारुती सुझुकीची विक्री १९.५ टक्क्यांनी वाढली. या दरम्यान कंपनीने १,१०,१४७ कार विकल्या तर गेल्या वर्षी याच अवधीत ९२,१४० कारची विक्री झाली होती. २०१४ मध्ये देशातील बाजारपेठेत १७ टक्के विक्री वाढून ती १,००,०२४ कार झाली. ह्युंदाई मोटार इंडियाच्या विक्रीत नोव्हेंबर २०१४ मध्ये ८.७ टक्क्यांची वाढ होऊन ५४,०११ कारची विक्री झाली. नोव्हेंबर २०१३ मध्ये ४९,६८१ कार विकण्यात आल्या होत्या. जनरल मोटार्सच्या वाहन विक्रीत नोव्हेंबरमध्ये तब्बल ३३.१ टक्क्यांनी घट होऊन ४,१५७ कार विकल्या गेल्या, तर गेल्यावर्षी त्या ६,२१४ विकल्या गेल्या होत्या. या कालावधीत कंपनीने चिलीला १५० कार निर्यात केल्या. महिंद्रा अँड महिंद्राच्या वाहन विक्रीत नोव्हेंबर महिन्यात १३ टक्क्यांची घट होऊन ३४,२९२ कारची विक्री झाली. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये ३९२५४ कार विकल्या गेल्या होत्या. देशातील बाजारपेठेत विक्री ११ टक्के घटून ३२,१०० विकल्या गेल्या.(वृत्तसंस्था)