शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
5
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
6
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
7
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
8
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
9
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
10
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
11
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

चीनला ज्याचा पुळका, तोच दहशतवादी मसूद अजहर ठरतोय भारतासाठी घातक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2019 5:40 AM

जैश-ए-मोहम्मद ही संघटना सुरू करणारा क्रूरकर्मा दहशतवादी मसूद अजहर याचा संयुक्त राष्ट्राच्या जागतिक दहशतवाद्यांच्या यादीत समावेश करण्यात चीनची आडकाठी आजही कायम आहे.

नवी दिल्ली : जैश-ए-मोहम्मद ही संघटना सुरू करणारा क्रूरकर्मा दहशतवादी मसूद अजहर याचा संयुक्त राष्ट्राच्या जागतिक दहशतवाद्यांच्या यादीत समावेश करण्यात चीनची आडकाठी आजही कायम आहे. चीनला पुळका असलेला हाच मसूद अजहर भारतासाठी घातक ठरतो आहे.काश्मीरमध्ये हरकत-उल-मुजाहिदीन या संघटनेत सक्रीय असलेल्या मसूदला भारतीय जवानांनी १९९४मध्ये अटक केली. त्याच्या सुटकेसाठी अनेकदा दहशतवाद्यांनी प्रयत्नही केले होते. पण, ते फसले होते. त्यानंतर २४ डिसेंबर १९९९ रोजी १८० प्रवासी असलेल्या भारतीय विमानाचे दहशतवाद्यांनी अपहरण केले. ते विमान कंधार येथे उतरवले. अपहृत विमान प्रवाशांच्या बदल्यात दहशतवाद्यांनी मसूद, मुश्ताक जरगर आणि शेख अहमद उमर सईद यांना सोडण्याची मागणी केली. सहा दिवसांच्या वाटाघाटीनंतर भारताने या तिघांनाही सोडले. प्रवाशांना वाचवले. पण, मसूदने २००० साली ‘जैश’ची स्थापना केली व तिच्यामार्फत काश्मीरमध्ये कारवाया सुरू केल्या. त्याच्या संघटनेने आतापर्यंत भारतात अनेक हल्ले केले आहेत.खुलेआम फिरतोय पाकिस्तानातपठाणकोट येथे झालेल्या हल्ल्यानंतर भारताने मसूदचा समावेश दहशतवाद्यांच्या यादीत व्हावा, अशी मागणी संयुक्त राष्ट्रांकडे केली होती. १४ सदस्य देशांनी या मागणीला पाठिंबा दिला होता. पण, चीनने आडकाठी केली. चीनला पुन्हा त्याचा पुळका आला आहे आणि भारतावर हल्ल्यांचे कट रचत सुटलेला मसूद अजहर अजूनही पाकिस्तान खुलेआम फिरतो आहे.भारतातील कारवायाश्रीनगरच्या बादामी बाग परिसरातील भारतीय सेनेच्या मुख्यालयावर हल्ला.जम्मू-कश्मीर सचिवालयाच्या इमारतीवर हल्ला.२००१ साली स्फोटकांनी भरलेली कार जम्मू-कश्मीर विधानसभेवर धडकवली. यात ३८ लोकांचा मृत्यू झाला होता.२००१ साली संसदेवर हल्ला.२०१६ साली पठाणकोट येथील हवाई दलाच्या तळावर हल्ला.२०१६ साली उरी येथील लष्करा हेडकॉर्टरवर भल्या पहाटे हल्ला. यात १९ जवान शहीद झाले होते.

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्ला