Kedarnath Avalanche :उत्तराखंडच्याकेदारनाथमध्ये रविवारी(दि.30) पहाटे हिमस्खलनाची धक्कादायक घटना घडली. मंदिराच्या पाठीमागे असलेल्या डोंगरावरुन मोठ्या प्रमणात बर्फ खाली कोसळला. सुदैवाने या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवित किंवा वित्तहानी झाली नाही. परंतु हिमस्खलनाचे दृष्य पाहून दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या हृदयाचा ठोका मात्र चुकला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, केदारनाथ मंदिरामागील पर्वतांवर रविवारी सकाळी अचानक हिमस्खलन झाले. पहाटे 5.6 वाजता गांधी सरोवरच्या वरच्या डोंगरावरुन मोठ्या प्रमाणात बर्फ कोसळू लागला. सुदैवाने हा बर्फ मंदिरापर्यंत पोहोचला नाही. आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नंदन सिंह राजवार यांनी सांगितले की, या टेकड्यांवर अनेकदा हिमस्खलन होत असते. पण, रविवारी झालेले हिमस्खलन फार मोठे नव्हते, त्यामुळे कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही.
2013 मध्ये भीषण पूर आलेला16 जून 2013 रोजी केदारनाथमध्ये भीषण ढगफुटीमुळे महापूर आला होता. या पुरात तेथील सर्व काही उद्ध्वस्त झाले होते. तसेच, त्या घटनेत सूमारे सहा हजार लोकांचा जीव गेला होता. आता आजच्या हिमस्खलनामुळे नागरिकांना नक्कीच 2013 ची घटना आठवली असेल.