मथुरा : दिल्ली आणि उत्तरप्रदेश या दोन राज्यांना जोडणाऱ्या यमुना एक्सप्रेस वेवर आज पहाटेच्या सुमारास एका गॅस टँकरने दुसऱ्या गॅस टँकरला धडक दिल्याने टँकरचा स्फोट झाला. यावेळी मोठी आग लागल्याने एक्सप्रेस वेवरून जाणारी अन्य 5 वाहनेही जळून खाक झाली असून तीन जण गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे.
यमुना एक्स्प्रेस वे हा सर्वात व्यस्त असलेला मार्ग म्हणून ओळखला जातो. या अपघातामुळे दोन्ही बाजुची वाहतूक काही तासांपासून ठप्प झाली आहे. पोलिस घटनास्थळी पोहोचले असून अग्निशामन दलाच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविण्य़ाचे प्रयत्न सुरु आहेत.
यमुना एक्सप्रेस वेवर शुक्रवारी मध्यरात्री एक खासगी एसी बस ट्रकवर आदळून झालेल्या अपघातात 4 जण ठार तर 13 जण गंभीर जखमी झाले आहेत. रस्ते चांगले बनविले तरीही अपघातांचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत आहे.