भोपाळमध्ये मंत्रालयाच्या इमारतीला भीषण आग; महत्त्वाची कागदपत्रं जळून खाक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2024 11:10 AM2024-03-09T11:10:54+5:302024-03-09T11:20:13+5:30
भोपाळमधील मंत्रालयाच्या इमारतीला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. चौथ्या मजल्यावर आग लागली आहे.
भोपाळमधील मंत्रालयाच्या इमारतीला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. इमारती काही मजल्यावर आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीची माहिती मिळताच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. लोक घाईघाईत इमारतीतून बाहेर आले.
अग्निशमन दलाला तत्काळ या आगीची माहिती देण्यात आली, त्यानंतर अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. ही आग कशी लागली याबाबत सध्या कोणतीही माहिती समोर आलेली नाही. आग एवढी भीषण होती की, अनेक महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाल्याचे सांगण्यात येत आहे.
VIDEO | Fire breaks out at state secretariat building in #Bhopal, Madhya Pradesh. Several fire tenders at the spot. More details are awaited.
— Press Trust of India (@PTI_News) March 9, 2024
(Full video available on PTI - https://t.co/n147TvqRQz) pic.twitter.com/EonjlewVm1
मिळालेल्या माहितीनुसार, वल्लभ भवनच्या पहिल्या, चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या मजल्यावर ही आग लागली. अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करत आहेत. मुख्यमंत्र्यांचे कार्यालय येथे पाचव्या मजल्यावर आहे.
#WATCH | Madhya Pradesh | A massive fire breaks out at Vallabh Bhavan State Secretariat in Bhopal. Firefighting operations are underway. Details awaited. pic.twitter.com/QBto0QSVIy
— ANI (@ANI) March 9, 2024