आसामच्या तिनसुकिया जिल्ह्यातील बगजानमधील ऑईल इंडिया लिमिटेडच्या गॅसच्या विहिरीला भीषण आग लागली. दोन आठवड्यांपासून येथील विहिरीतून सतत गॅसगळती सुरू होती, त्यानंतर आज मंगळवारी प्रचंड आग लागली. आगीमुळे सातत्याने विहिरीतून धूर बाहेर पडत होता. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी व कोणतेही नुकसान टाळण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (एनडीआरएफ)ची टीम घटनास्थळी पोहोचली आहे.प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, 'ऑईल इंडिया लिमिटेडच्या गॅसच्या विहिरीत इतका भीषण स्फोट झाला की, दोन किलोमीटरच्या अंतरावरून तो स्पष्ट दिसू शकत होता. आगीत आतापर्यंत कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झालेले नाहीत. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून, आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे अधिका-यांनी सांगितले. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
आसाममध्ये ऑइल इंडिया लिमिटेडच्या गॅस विहिरीत भीषण आग, NDRFची टीम घटनास्थळी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2020 7:02 PM