लोकसभा निवडणुकीपूर्वी देशात CAA लागू करण्याच्या चर्चा सुरू आहेत. आता या विरोधात आसाममध्ये जोरदार आंदोलन सुरू झाले आहे. ऑल आसाम स्टुडंट्स युनियनसह ३० हून अधिक गटांनी आसाममधील नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला (CAA) विरोध करण्याची घोषणा केली आहे. AASU अध्यक्ष उत्पल शर्मा यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आसाम दौऱ्यादरम्यान ९ मार्च रोजी सर्व जिल्ह्यांमध्ये १२ तासांच्या उपोषणासह आंदोलन केले जाईल. CAA विरोधात सर्वोच्च न्यायालयात अनेक खटले सुरू आहेत.
AASU अध्यक्ष उत्पल शर्मा म्हणाले की, CAA विरोधात सर्वोच्च न्यायालयात अनेक खटले सुरू आहेत आणि अशा परिस्थितीत त्याची अंमलबजावणी जाहीर करणे हा लोकांवर घोर अन्याय आहे. आसामच्या जनतेने सीएए कधीच स्वीकारला नाही आणि जर त्याची अंमलबजावणी झाली, तर ते या दिशेने उचललेल्या प्रत्येक पावलाला विरोध करतील.
जातीपेक्षा पक्ष मोठा झाला का?; मनोज जरांगे पाटील मराठा नेत्यांवर संतापले
"सीएए विरोधी आंदोलन ४ मार्च रोजी प्रत्येक जिल्हा मुख्यालयात मोटारसायकल रॅलीने सुरू होईल आणि मशाल रॅली देखील काढण्यात येईल. जेव्हा पंतप्रधान ८ मार्चला आसाममध्ये येतील तेव्हा AASU आणि इतर ३० गट २०१९ मध्ये CAA विरोधी निदर्शनांदरम्यान पोलिस गोळीबारात मारल्या गेलेल्या पाच तरुणांच्या फोटोसमोर दिवे लावतील, असेही ते म्हणाले.
पंतप्रधान ८ मार्चपासून आसामच्या दोन दिवसीय दौऱ्यावर असतील, त्या दरम्यान ते काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात जंगल सफारी करतील, १७ व्या शतकातील अहोम सेनापती लचित बोरफुकन यांच्या १२५ फूट उंच पुतळ्याचे अनावरण करतील आणि पायाभरणी करतील. शिवसागर मेडिकल कॉलेज आणि ५.५ लाख रुपयांच्या गृहनिर्माण योजनेंतर्गत बांधलेल्या घरांचे पंतप्रधान उद्घाटन करतील. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी यापूर्वीच त्यांच्या भाषणात CAA च्या घोषणेबद्दल बोलले आहेत.
नागरिकत्व कायद्याबाबत शाह म्हणाले होते की, हा कायदा २०१९ मध्ये मंजूर झाला होता. यासंदर्भातील नियमावली जारी केल्यानंतर लोकसभा निवडणुकीपूर्वी त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. सीएए हा देशाचा कायदा आहे, त्याची अधिसूचना नक्कीच काढली जाईल. CAA निवडणुकीपूर्वी लागू करणे आवश्यक आहे, त्यामुळे कोणीही यात गोंधळ करू नये.