शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
2
माहिममध्ये मोठा खेळ झाला? भाजपच्या नेत्याचा निवडणुकीनंतर ठाकरे गटात प्रवेश 
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'नवरीचा पत्ता नाही आणि यांनी लग्नाची तयारी केली'; नारायण राणेंचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल
4
'भाजप सरकार आल्यावर वीज अन् पाण्याची बिले भरावी लागतील', अरविंद केजरीवालांचे टीकास्त्र
5
IND vs AUS : 'जानी दुश्मन' ठरला एकदम 'सस्ता'; हर्षित राणाची पहिली विकेट एकदम झक्कास (VIDEO)
6
कॅनडा झालं सुतासारखं सरळ! आता म्हणे- निज्जर हत्याकांडात भारताचा कुठलाही समावेश नाही!
7
पंढरपूर, मंगळवेढ्यासह प्रमुख ३० गावे ठरवणार नवीन आमदार; तुतारी, इंजिन कुणाच्या विजयाचे गणित बिघडवणार?
8
बुध वक्री अस्तंगत: ४ राशींना अडचणी, समस्या; ४ राशींना सर्वोत्तम संधी, सुखाचा वरदान काळ!
9
शेअर बाजार सुस्साट.., Sensex मध्ये २००० अंकांची तेजी; Nifty ५९० अंकांनी वधारला, अदानींचा जोरदार कमबॅक
10
स्पष्ट बहुमत मिळालं नाही तरी भाजपा सरकार स्थापन करणार? असा आहे महायुतीचा 'प्लॅन बी'  
11
बॅक टू बॅक सिनेमांमध्ये का दिसत नाही श्रद्धा कपूर? म्हणाली, "ऐनवेळी रिप्लेस केलं..."
12
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता किती? ४८ तासांत आमदारांसमोर हे आव्हान
13
हालचालींना वेग! बच्चू कडूंना महायुतीसह मविआकडूनही फोन; कोणाला पाठिंबा देणार?
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : आधी अजित पवारांच्या मुख्यमंत्रि‍पदाचा बॅनर लावला, पण काहीवेळातच काढला, कारण काय?
15
"४-५ सिनेमे एकाच दिवशी प्रदर्शित केले तर...", मराठी इंडस्ट्रीबद्दल शरद केळकरचं मोठं वक्तव्य, म्हणाला- "साऊथमध्ये..."
16
'या' स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश; SBI, पॉवर ग्रिड, रिलायन्सवर फोकस; काय आहे टार्गेट प्राईज, आणखी कोणते शेअर्स?
17
पुन्हा तीच परिस्थिती ओढवू नये; मविआ सतर्क, विजयी आमदारांना तात्काळ मुंबईला येण्याचे निर्देश
18
IND vs AUS : स्मिथच्या पदरी 'गोल्डन डक'; Jasprit Bumrah ची हॅटट्रिक हुकली, पण...
19
"संजय राऊत हायकमांड, त्यांच्यावर प्रतिक्रिया देणं योग्य नाही", नाना पटोले यांनी लगावला टोला
20
विवाहांच्या मुहुर्तांदरम्यान सोन्या-चांदीच्या दरात बदल, पटापट चेक करा मुंबई ते दिल्लीपर्यंतचे दर

मथुरा शाही ईदगाहच्या सर्वेक्षणाचे कोर्टाने दिले आदेश, 20 जानेवारीपर्यंत अहवाल मागवला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2022 2:22 PM

श्रीकृष्णाचे जन्मस्थान असलेल्या शाही ईदगाहच्या प्रकरणात आज मथुरा न्यायालयाने वादग्रस्त जागेचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत.

Shahi Eidgah Mosque Survey: श्रीकृष्णाचे जन्मस्थान असलेल्या शाही ईदगाहच्या प्रकरणात आज मथुरा न्यायालयाने वादग्रस्त जागेचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. अमीन यांना शाही इदगाह वादग्रस्त जागेचा सर्व्हे अहवाल नकाशासह 20 जानेवारीपर्यंत न्यायालयात सादर करावा लागणार आहे. सर्व प्रतिवादींना नोटीस बजावण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ विभाग III सोनिका वर्मा यांच्या न्यायालयाने शाही ईदगाहच्या वादग्रस्त जागेचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले.'हिंदू सेनेने दाखल केलेल्या दाव्यात आदेश देण्यात आला आहे, अशी माहिती  वकील शैलेश दुबे यांनी दिली. 

श्रीकृष्ण जन्मस्थानची 13.37 एकर जमीन मोकळी करण्यासाठी आणि शाही इदगाह वादग्रस्त जागेवरून हटवण्यासाठी न्यायालयात दावा दाखल करण्यात आला आहे. दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ विभाग (III) च्या न्यायालयाने हिंदू सेनेच्या दाव्यावर सुनावणी करताना शाही इदगाह मशिदीचे अमीन सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. अमीन यांना 20 जानेवारीपर्यंत अहवाल सादर करावा लागणार आहे. विशेष म्हणजे वाराणसीतील ज्ञानवापी प्रकरणात न्यायालयाने ज्याप्रमाणे आदेश दिले होते त्याच धर्तीवर हे आहे. त्यावर गुरुवारी प्रतिवादींना नोटीस बजावण्यात येणार होती, मात्र सुनावणी होऊ शकली नाही. या प्रकरणाची पुढील सुनावणी 20 जानेवारीला होणार आहे.

कोरोनाची भीती! सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये, 'या' 5 देशांतून येणाऱ्यांसाठी RT-PCR आवश्यक! 

8 डिसेंबर रोजी हिंदू सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विष्णू गुप्ता आणि दिल्लीत राहणारे उपाध्यक्ष सुरजित सिंह यादव यांनी दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ विभाग (III) न्यायमूर्ती सोनिका वर्मा यांच्या न्यायालयात दावा केला होता. या दाव्यात, औरंगजेबाने श्रीकृष्ण जन्मभूमीचे 13.37 एकरवरील मंदिर पाडून ईदगाह तयार केला होता. भगवान श्रीकृष्णाच्या जन्मापासून ते मंदिर उभारणीपर्यंतचा संपूर्ण इतिहास त्यांनी न्यायालयासमोर मांडला. श्रीकृष्ण जन्मस्थान सेवा संघ विरुद्ध शाही मशीद इदगाह यांच्यात 1968 साली झालेल्या करारालाही त्यांनी आव्हान दिले आहे.

फिर्यादीचे वकील शैलेश दुबे यांनी सांगितले की, 8 डिसेंबर रोजी संपूर्ण प्रकरण न्यायालयासमोर ठेवले होते. न्यायालयाने त्याच दिवशी गुन्हा नोंदवून अमीन यांना प्रत्यक्ष परिस्थितीचे सर्वेक्षण करून नकाशासह अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. या संदर्भात 22 डिसेंबर रोजी न्यायालयात सुनावणी होऊ शकली नाही. आता 20 जानेवारीपर्यंत वादग्रस्त जागेचे सर्वेक्षण करून अहवाल न्यायालयात सादर करावा लागणार आहे.

टॅग्स :Courtन्यायालय