शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

मथुरा-शाही ईदगाह केस : जिल्हा न्यायालयाकडून श्रीकृष्‍ण विराजमानची याचिका मंजूर, 1 जुलैला सुनावणी 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2022 2:11 PM

फिर्यादी पक्षाचे वकील गोपाल खंडेलवाल यांनी माध्यमांशी  बोलताना सांगितले, की सप्टेंबर 2020 मध्ये सिव्हिल कोर्टाने ही केस 'राइट इश्‍यू' नाही असे म्हणत फेटाळली होती.

मथुरेच्या जिल्हा न्यायालयाने गुरुवारी एक महत्‍वपूर्ण निर्मय घेत, श्रीकृष्‍ण विराजमानची याचिका स्‍वीकारली आहे. पुनरविचार म्हणून दाखल करण्यात आलेल्या या याचिकेवर गेल्या दीड वर्षांपासून सुनावणी सुरू होती. आज जिल्हा न्यायालयाने ही याचिका स्‍वीकारली. यासंदर्भात एक जुलैला पुढील सुनावणी होईल. महत्वाचे म्हणजे न्यायालयाच्या या निर्णयावर सर्वांचेच लक्ष होते. फिर्यादी पक्षाचे वकील गोपाल खंडेलवाल यांनी माध्यमांशी  बोलताना सांगितले, की सप्टेंबर 2020 मध्ये सिव्हिल कोर्टाने ही केस 'राइट इश्‍यू' नाही असे म्हणत फेटाळली होती. म्हणजेच, या प्रकरणात कुणालाही वाद करण्याचा अधिकार नाही. यानंतर हे प्रकरण जिल्हा न्यायालयात गेले. आज जिल्हा न्यायालयाने फिर्यादी पक्षाची पुनरविचार याचिका स्‍वीकारली आहे. तसेच पुढील सुनावणीसाठी 1 जुलै ही तारीख निश्चित करण्यात आली आहे.

याचिकेत करण्यात आली आहे अशी मागणी - या याचिकेत 2.37 एकर जमीन मुक्‍त करण्याची मागणी करण्यात आली आहे. श्रीकृष्‍ण विराजमानच्या एकून 13.37 एकर जमीनीपैकी जवळपास 11 एकर जमिनीवर श्रीकृष्‍ण जन्‍मस्‍थान आहे. तर शाही ईदगाह मशीद 2.37 एकर जागेवर आहे. हीच 2.37 एकर जमीन मुक्‍त करून, ती श्रीकृष्‍ण जन्‍मस्‍थानात सामील करण्यात यावी, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. 

महत्वाचे म्हणज, यासंदर्भात, संस्‍थानला कुठल्याही प्रकारची तडजोड करण्याचा अधिकार नाही. ही जमीन ठाकुर विराजमान केशव कटरा मंदिराच्या नावार आहे, असे फर्यादी पक्षाचे म्हणणे आहे.   

टॅग्स :Courtन्यायालयTempleमंदिरMosqueमशिद