नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात च्या 41 व्या भागात विविध मुद्यांवरून देशवासीयांशी संवाद साधला. यावेळी मोदींनी यंत्रांचा मानव कल्याणासाठी वापर करण्याचे आणि दुर्घटना टाळण्यासाठी खबरदारी घेण्याचे आवाहन देशवासियांना केली. त्याबरोबरच विज्ञान दिवस, जागतिक महिला दिन आणि नॅशनल सेफ्टी डे विषयी चर्चा करतानाच मोदींनी होळीविषयीचे आपले अनुभव देशवासियांना ऐकवले. तसेच देशवासियांना होळीच्या शुभेच्छा दिल्या. नरेंद्र मोदींनी आजच्या मन की बातची सुरुवात विज्ञान दिवसाच्या आठवणीने केली. यावेळी त्यांनी प्राचीन काळातील बोधायन, भास्कराचार्य आणि आर्यभट यांचा उल्लेख केला. तसेच आधुनिक काळातील भारतरत्न सर सी.व्ही. रमन यांचीही आठवण मोदींनी काढली. सर जगदीशचंद्र बोस, हरगोविंद खुराणा यंच्यापासून सत्येंद्रनाथ बोस यांच्यासारखे शास्त्रज्ञ भारतवासीयांचे भूषण असल्याचे त्यांनी सांगितले. मन की बात मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 4 मार्च रोजी होणाऱ्या नॅशनल सेफ्टी डे चा उल्लेख केला. सुरक्षेच्याबाबती निष्काळजीपणा न दाखवल्यास जीवन सुरक्षित होऊ शकते. बहुतांश दुर्घटना चुकांमुळे होतात. त्यामुळे चुका टाळल्यास अशा दुर्घटना कमी होऊ शकतात, असे मोदी म्हणाले. यावेळी मोदींनी एनडीएमएच्या कार्याचेही कौतुक केले. नैसर्गिक आपत्तीशी लढण्यासाठी एनडीएमए कायम सज्ज असते. एनडीएमएकडून नागरिकांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. आपत्ती व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळली जात आहे."असे मोदी म्हणाले. आर्टिफिशल इंटेलिजन्सच्या माध्यमातून रोबोट्स, बोट्स आणि स्पेसिफिक टाक्स करणाऱी यंत्रे बनवण्यास मदत मिळते. आजकाल यंत्रे सेल्फ लर्निंग मधून इंटेलिजेंट आणि स्मार्ट बनत आहेत, त्यामुळे आर्टिफिशन इंटेलिजन्सचा वापर करून दिव्यांगांचे जीवन सुधारण्यासाठी मदत होऊ शकते का याची चाचपणी व्हायला हवी. देशवासियांशी संवाद साधताना स्वातंत्र्यानंतर 70 वर्षांनी वीज पोहोचलेल्या मुंबई जवळील एलिफंटा येथील 3 गावांचाही मोदींनी आवर्जुन उल्लेख केला. तसेच महिलांनी स्वत:च्या आत्मबळाच्या जोरावर स्वत:ला स्वयंपूर्ण बनवल्याचे त्यांनी सांगितले.
मन की बात : योग्य खबरदारी घेतल्यास दुर्घटना टळतीत - मोदी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2018 1:23 PM