नवी दिल्ली: दिल्लीतील रामलीला मैदानावर जमियत उलेमा-ए-हिंदच्या अधिवेशनात मंचावर मोठा गोंधळ झाला. मौलाना अर्शद मदनी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्यावर टीका करताना अल्लाह आणि ओम एकच असल्याचे म्हटले. यानंतर जैन गुरु लोकेश मुनी यांनी यावर आक्षेप घेतला. त्यानंतर जैन आणि इतर अनेक धर्मगुरुंनी मंच सोडला.
जमियत उलेमा-ए-हिंदच्या 34 व्या अधिवेशनात मौलाना अर्शद मदनी यांनी मोहन भागवत यांचे वक्तव्य चुकीचे असल्याचे म्हटले. 'अल्लाह आणि ओम एकच आहेत. आम्ही या देशात पहिल्यांदा जन्मलो आणि म्हणूनच भागवतांचे सर्व मुस्लिम हिंदू आहेत, हे विधान अतिशय चुकीचे आहे,' असे मदनी म्हणाले. यानंतर जैन गुरू लोकेश मुनी यांनी मंचावर उभे राहून या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला.
भाजप आणि आरएसएसशी शत्रुत्व नाही : मदनीयापूर्वी महमूद मदनी म्हणाले होते की, भाजप आणि आरएसएसशी शत्रुत्व नाही, पण धर्माच्या आधारावर भेदभाव करू नये. आमच्यात वैचारिक मतभेद आहेत. RSS संस्थापकाच्या Bunch of Thoughts या पुस्तकात अनेक समस्या आहेत, पण सध्याच्या RSS प्रमुखांच्या अलीकडच्या विधानांकडेही दुर्लक्ष करता कामा नये. मतभेद संपवण्यासाठी आम्ही संघ प्रमुख आणि त्यांच्या नेत्यांचे स्वागत करतो. पण, मुस्लिमांना पैगंबरांचा अपमान मान्य नाही. शिक्षणाचे भगवेकरण होत आहे. कोणत्याही धर्माची पुस्तके इतरांवर लादू नयेत, असेही ते म्हणाले.
'भारताचा मूळ धर्म सनातन, मौलाना मदनी फतव्याचा कारखाना'
सुफी इस्लामिक बोर्डाने जमियत उलेमा हिंदचे अध्यक्ष मौलाना महमूद मदनी यांच्या विधानावर आक्षेप नोंदवला आहे. बोर्डाचे राष्ट्रीय प्रवक्ते कशिश वारसी यांनी मदानी यांच्या विधानाला विरोध करताना म्हटले की, इस्लाम हा भारताचा मूळ धर्म नाही. येथील मूळ धर्म सनातन आहे. महमूद मदनी बद्दल सांगायचे, तर तो फतव्याचा कारखाना आहे. इस्लाम पहिल्या येणाऱ्या मुस्लिमांनी आणला. हजरत मतलतुल औलिया, मकरबूर शरीफ आले, त्यानंतर अरबस्तानातील कासिम बिन मलिक भारतात केरळमध्ये आले. त्यानंतर रसूल करीम सल्लल्लाह अला पाकचे ख्वाजा गरीब नवाज आले. ज्यांनी इथे येऊन इस्लामचा प्रसार केला. त्यांच्या चारित्र्यामुळे आणि चांगल्या वागणुकीमुळे येथे इस्लामचा प्रसार झाला. आज देशातील सरकार कोणत्याही मुस्लिमाला बाहेरचा माणूस मानत नाही, असेही ते म्हणाले.