नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून लडाखमध्येभारत आणि चीनचे सैन्य आमनेसामने येत आहे. त्यामुळे दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे. लडाखच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर काही दिवसांपासून तणाव निर्माण झाला. यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर काँग्रेसने जोरदार हल्लाबोल केला आहे. नरेंद्र मोदी हे सीमा वादावर राजकीय पक्षांना आणि माजी पंतप्रधानांना माहिती देत नसल्याचा आरोप काँग्रेसच्या वतीने करण्यात आला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी ट्विटवरून मोदींवर निशाणा साधला आहे.
"चीनने 1962 मध्ये भारतावर हल्ला केला. अटल बिहारी वाजपेयी आणि अन्य नेत्यांनी त्यावेळी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना पत्र लिहून संसदेचं अधिवेशन बोलावण्याची मागणी केली. नेहरूंनी देखील त्यांच्या मागणीचा स्वीकार केला आणि त्यांच्यावर केलेल्या टीकाही त्यांनी ऐकल्या... आता आपल्याकडे 'मौनेंद्र मोदी' आहेत. ते माजी पंतप्रधान किंवा राजकीय पक्षांच्या नेत्यांना कोणतीही माहिती देत नाहीत" असं ट्वीट जयराम रमेश यांनी केलं आहे.
सीमेवरील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर रविवारी दोन्ही देशांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक महत्त्वाची बैठक झाली. यामध्ये संवादाच्या माध्यमातून सीमा वाद सोडवण्यावर एकमत झाले. मात्र, यानंतर सोमवारी चीनने कोणतीही सकारात्मक पावले टाकली नाहीत. उलट युद्धाभ्यास सुरू करीत भारतावर दबाव वाढवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आता पूर्व लडाखमधील गलवान भागातून चिनी सैन्य मागे हटले आहे. गलवानमध्येच भारत आणि चीनचे सैनिक आमनेसामने आले होते. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला. यानंतर आता दोन्ही देशांनी या भागातील सैन्य माघारी बोलावण्यास सुरुवात केली.
सोमवारी रात्रीपासून सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया सुरू झाली. मंगळवारी पहाटेपर्यंत ही प्रक्रिया सुरू होती. चीनने सैन्य हटवल्याने भारताने सकारात्मक प्रतिसाद दिला आणि जवानांना परतण्याचे आदेश दिले. जगभर फैलावलेल्या कोरोना व्हायरसमुळे सध्या चीनवर अमेरिकेसह सर्व जगभरातून टीका केली जात आहे. कोरोना व्हायरससाठी चीनला दोषी ठरवले जात आहे. त्यातच चीनने भारत सीमेवर जास्तीचे सैन्य तैनात केल्यामुळे जगभरात आणखी नाचक्की होईल, यामुळे चीनने त्यांचे सैन्य माघारी घेतले. या प्रकरणात भारताने घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळेही चीनने नरमाईचे धोरण अवलंबले आहे, असे समजले जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : बापरे! तब्बल 35 निगेटिव्ह लोकांना दिला कोरोनाचा 'पॉझिटिव्ह' रिपोर्ट अन्...
CoronaVirus News : आशेचा किरण! कोरोनाच्या लढ्याला यश येणार, मांजरींवरील 'हे' औषध प्रभावी ठरणार?
देशातील प्रत्येक नागरिकाला रिलीफ फंडातून मिळणार 7500 रुपये?
CoronaVirus News : धोक्याची घंटा! कोरोनामुळे जगात तब्बल 10 कोटी लोकांचा होऊ शकतो मृत्यू
CoronaVirus News : 'हा' रक्तगट असणाऱ्या व्यक्तींना कोरोनाचा सर्वात कमी धोका; रिसर्चमधून खुलासा
भारतीय लष्कराला सलाम! चीनच्या तज्ज्ञांनीही केलं भरभरून कौतुक!!