नागपुरात बर्धन यांचे स्मारक व्हावे
By admin | Published: January 08, 2016 2:13 AM
ज्येष्ठ समाजसेवक उमेशबाबू चौबे यांनी बर्धन यांना श्रद्धांजली वाहताना बर्धन यांचे स्मारक त्यांच्या कर्मभूमीत व्हावे, अशी मागणी केली. त्यासाठी महापौरांनी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली. यासह त्यांच्या आठवणीही पुस्तकरूपाने प्रकाशित करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. जोगेंद्र कवाडे यांनीही या मागणीला दुजोरा देत त्यांचे स्मारक नागपुरात उभे करणे हीच त्यांना श्रद्धांजली ठरेल, असे सांगितले. यावर नितीन गडकरी यांनी त्यांचे स्मारक झाले पाहिजे. यासाठी केंद्र व राज्य शासन शक्य ती मदत करेल, असे जाहीर करताना केवळ स्मारक उभारण्यापेक्षा त्यांच्या विचारांवर त्यांचे काम समोर नेण्याची गरज व्यक्त केली. संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या एका कार्यकर्त्याने त्यांच्या स्मारकासाठी जागा उपलब्ध करण्याच्या कार्यात जांबुवंतराव धोटे यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. जा
ज्येष्ठ समाजसेवक उमेशबाबू चौबे यांनी बर्धन यांना श्रद्धांजली वाहताना बर्धन यांचे स्मारक त्यांच्या कर्मभूमीत व्हावे, अशी मागणी केली. त्यासाठी महापौरांनी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली. यासह त्यांच्या आठवणीही पुस्तकरूपाने प्रकाशित करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. जोगेंद्र कवाडे यांनीही या मागणीला दुजोरा देत त्यांचे स्मारक नागपुरात उभे करणे हीच त्यांना श्रद्धांजली ठरेल, असे सांगितले. यावर नितीन गडकरी यांनी त्यांचे स्मारक झाले पाहिजे. यासाठी केंद्र व राज्य शासन शक्य ती मदत करेल, असे जाहीर करताना केवळ स्मारक उभारण्यापेक्षा त्यांच्या विचारांवर त्यांचे काम समोर नेण्याची गरज व्यक्त केली. संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या एका कार्यकर्त्याने त्यांच्या स्मारकासाठी जागा उपलब्ध करण्याच्या कार्यात जांबुवंतराव धोटे यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. जागा उपलब्ध व्हायची असेल तर स्वतंत्र विदर्भ राज्याशिवाय पर्याय नाही, असा सूर विदर्भवादी कार्यकर्त्यांनी लावला. त्यामुळे वेगळा विदर्भ करा आणि जागा मिळवा, अशी टिपणीही यावेळी जोडली. या विषयाची चर्चा उपस्थितांमध्ये रंगली होती. कार्यक्रमाचे संचालन कॉम्रेड मोहन शर्मा यांनी केले. याप्रसंगी दोन मिनिटे मौन पाळून ए.बी. बर्धन यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.