ऑनलाइन लोकमतलखनऊ, दि. 11 - बहुजन समाज पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेल्या नसीमुद्दीन सिद्दिकींनी मायावतींवर गंभीर आरोप केले आहेत. मायावतींनी निवडणुकीतल्या पराभवानंतर मुस्लिमांना गद्दार म्हणून संबोधल्याचा आरोपही नसीमुद्दीन सिद्दिकी यांनी केला आहे. तसेच मुस्लिमांबाबत मायावतींनी असंसदीय भाषाही वापरली आहे. आज पत्रकार परिषद घेऊन सिद्दिकींनी मायावतींवर गंभीर आरोप केले आहेत. मायावतींची एक ऑडियो टेपही सिद्दिकी यांनी पत्रकारांना ऐकवली आहे. सिद्दिकींनी मायावतींच्या रेकॉर्डिंगचे जवळपास 150 टेप असल्याचंही सांगितलं आहे. सिद्दिकी म्हणाले, उत्तर प्रदेशच्या निवडणुकांनंतर मायावतींनी मला दिल्लीत बोलावलं. माझ्यासोबत मुलगा अफझलही होता. त्यांनी मला विचारलं मुस्लिमांनी बीएसपीला मतं काही नाही दिली ?, मी म्हटलं बहनजी असं काही नाही आहे. मुस्लिमांनी बीएसपीला मत दिलं आहे. जोपर्यंत काँग्रेस आणि समाजवादी पार्टीची आघाडी झाली नव्हती तोपर्यंत मुस्लिम आपल्यासोबत होते. मात्र त्या दोन पक्षांची आघाडी झाल्यानंतर मुस्लिमांच्या मतांमध्ये धुव्रीकरण झाले. आम्हालाही त्यांची मतं मिळाली. मात्र पहिले ज्या संख्येनं मुस्लिम पाठीशी होते त्याप्रमाणात मतं मिळाली नाहीत. त्यावेळी मायावतींनी माझ्या वक्तव्याशी सहमत नसल्याचं सांगितलं. तसेच त्यानंतर एक दिवशी मला बोलावलं आणि पार्टीला 50 कोटींची गरज असल्याचं सांगितलं. मी म्हटलं माझ्याजवळ एवढा पैसा कुठे आहे. त्यांनी मला मालमत्ता विकण्यास सांगितली. दरम्यान, मी म्हणालो तुम्हाला रोख पाहिजे असलेले पैसे नोटाबंदीनंतर मिळणं शक्य नाही. तसेच बायको आणि मुलांच्या नावे असलेली मालमत्ता विकून टाका. त्यानंतर मी पैसे जमवण्याचा प्रयत्नही केला. मात्र मायावती सारख्या फोन करून पैशांची मागणी करत होत्या. त्यानंतर मी त्यांना पैसे देऊ शकत नसल्याचंही त्यांना समजल्यावर त्यांनी मला पक्षातून काढून टाकलं. मला याची पूर्वकल्पना असल्याचंही नसीमुद्दीन सिद्दिकी म्हणाले आहेत.
Baad mein unho ne aur jaatiyon ko bhi bura bhala kaha. Kanshiram ji ka bhi apmaan kiya: Naseemuddin Siddiqui pic.twitter.com/NUR3Fq0ccs— ANI UP (@ANINewsUP) May 11, 2017