शहरं
Join us  
Trending Stories
1
लेबनॉनचे लष्कर, सरकार गायब! लोक सिरियाकडे पलायन करू लागले, रात्र काढली रस्त्यावर बसून
2
भाजपा नेते हर्षवर्धन पाटलांना राष्ट्रवादीत घेणार का?; शरद पवारांचं मोठं विधान
3
Balasaheb Thorat : 'हर्षवर्धन पाटलांना चांगल्या संधी काँग्रेसमध्ये दिल्या, त्यांचा निर्णय चुकला'; बाळासाहेब थोरातांनी स्पष्टच सांगितलं
4
मविआत उद्धव ठाकरेंवर दबाव?; ठाकरे गटाच्या नेत्याचा काँग्रेसला गर्भित इशारा
5
जितेंद्र आव्हाडांकडून खळबळजनक ऑडिओ क्लिप पोस्ट; अक्षय शिंदेची हत्या झाल्याचा दावा
6
'त्या' खेळाडूंवर बंदी घालायलाच हवी; नवीन नियमाचे इरफान पठाणकडून स्वागत; BCCI चे आभार!
7
"कुठलाही आजार वगैरे झालेला नाही"; सुशांत शेलारने सांगितलं वजन का आणि कसं कमी झालं!
8
₹100000 पार जाणार सोन्याचा भाव...? दिसतोय US Fed च्या निर्णयाचा परिणाम! या वर्षात झाली 30% वाढ
9
पितृपक्षात सोम प्रदोष शिवरात्री: ‘या’ गोष्टी अवश्य करा; पितृदोष मुक्तता, महादेव कृपा करतील!
10
धक्कादायक! गाडी नीट चालवायला सांगितली म्हणून पोलिसाची केली हत्या; दिल्लीतील घटना
11
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना पितृपक्षाची शुभ सांगता, ऑक्टोबर आणेल अच्छे दिन; अपार यश-लाभ!
12
आता IPL मधून माघार घेणाऱ्या खेळाडूला मोजावी लागणार मोठी किंमत; जाणून घ्या नवा नियम
13
पितृपक्ष: एकाच दिवशी प्रदोष शिवरात्री शुभ संयोग; कसे करावे व्रत? पाहा, महात्म्य अन् मान्यता
14
IND vs BAN T20 : ऋतुराज गायकवाडला पुन्हा डच्चू! चाहत्यांचा रोष; चांगली कामगिरी असूनही वगळलं
15
भाजपाने अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आमदार फोडला; विधानसभा निवडणुकीपूर्वीच मोठा झटका दिला
16
"CSK च्या चाहत्यांसाठी दुःखाची बाब आहे पण...", गंभीरची जागा घेताच ड्वेन ब्राव्हो भावुक
17
टेक ऑफला वैमानिकाचा नकार; उद्योगमंत्री सामंत गेले मोटारीने, मालकाला फोन लावला तरी...
18
अमेरिकेनं दिलेल्या 5000 पाउंड वजनाच्या 'स्पेशल गिफ्ट'नं मरला गेला नसरल्लाह! इराणचा मोठा दावा
19
Video: पगार ६० लाख पण जगणं कठीण; कॅनडात भारतीयांना पैसे पुरेना, कारण काय?
20
कोल्हापूर : दोन्ही आघाड्यांच्या संभाव्य उमेदवारांचे चित्र स्पष्ट; सहा मतदारसंघात बंडखोरीची शक्यता

मायावती व स्मृती इराणींची खडाजंगी

By admin | Published: February 25, 2016 3:27 AM

देशभर दलित विद्यार्थ्यांवर अत्याचार होत असल्याचा गंभीर आरोप करीत, रोहित वेमुलाच्या आत्महत्याप्रकरणी बसपच्या प्रमुख मायावतींनी राज्यसभेत बुधवारी मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी

नवी दिल्ली : देशभर दलित विद्यार्थ्यांवर अत्याचार होत असल्याचा गंभीर आरोप करीत, रोहित वेमुलाच्या आत्महत्याप्रकरणी बसपच्या प्रमुख मायावतींनी राज्यसभेत बुधवारी मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी आणि श्रममंत्री बंडारू दत्तात्रय यांचा राजीनामा मागितला. प्रत्युत्तरादाखल स्मृती इराणी म्हणाल्या की, ‘मायावतींच्या तमाम आक्षेपांचे उत्तर देण्यास मी तयार आहे. मात्र, आरोप- प्रत्यारोपांच्या रणनीतीसाठी एका मृत विद्यार्थ्याचा जर कोणी शस्त्रासारखा वापर करणार असेल, तर तो आम्हाला कदापि मान्य नाही.मायावतींनी शून्यप्रहरात रोहित वेमुलाच्या आत्महत्येचा विषय उपस्थित केला. आत्महत्येसाठी रोहितला मजबूर करण्यात आले. सबब आत्महत्येच्या चौकशी पथकात किमान एका दलिताचा समावेश असायलाच हवा, ही मायावतींची प्रमुख मागणी होती. सरकार जोपर्यंत ही मागणी मान्य करीत नाही, सभागृहाचे कामकाज चालू दिले जाणार नाही, असेही त्यांनी ठणकावले. त्यावेळी बसप सदस्यांनी सरकारविरोधी घोषणा सुरू केल्या. त्यावर अर्थमंत्री अरुण जेटली मायावतींना म्हणाले की, तुम्ही आरोप केला आहे, तर सरकारचे उत्तरही तुम्हाला ऐकावेच लागेल. मात्र, स्मृती इराणी सभागृहाची दिशाभूल करीत असल्याचा आरोप बसपचे सतीशचंद्र मिश्रा यांनी करताच, त्या उसळून उत्तर द्यायला उठल्या; पण इराणींना थांबवत माकपचे सीताराम येचुरी म्हणाले की, आपण मंत्री आहात, सभागृहात तुमचे वर्तन मंत्र्यासारखेच असले पाहिजे. मायावतींच्या अगोदर विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी जेएनयू विद्यार्थ्यांवरील देशद्रोहाच्या खटल्याचे प्रकरण उपस्थित केले होते. चर्चेत सहभागी होताना, सीताराम येचुरी म्हणाले की, सरकार देशद्रोहाच्या कायद्याचा राजरोस दुरुपयोग करीत असल्याने सभागृहात चर्चा नेमकी कशावर, असा संभ्रम निर्माण झाला आहे. त्यावर जेएनयू आणि रोहित वेमुलाची आत्महत्या ही दोन वेगळी प्रकरणे असल्याने दोन्ही विषयांवर स्वतंत्र चर्चा हवी, अशी मागणी मायावती यांनी केली. कामकाज सुरू होताच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक संघर्षामुळे पहिल्याच तासात ३वेळा व दिवसभरात ७ वेळा सभागृहाचे कामकाज तहकूब झाले. (विशेष प्रतिनिधी)