शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
2
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
3
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
4
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा
5
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
6
'पंचायत'च्या मेकर्सने केली नव्या सिनेमाची घोषणा, सिद्धार्थ मल्होत्रा प्रमुख भूमिकेत! 'या' दिवशी होणार प्रदर्शित
7
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
8
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
9
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
10
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा
11
सरवणकरांच्या कार्यालय उद्घाटनाला आशिष शेलारांची दांडी; भाजपा अमित ठाकरेंच्या पाठिशी?
12
Tax Savings in FY25: पोस्ट ऑफिसची 'ही' जबरदस्त स्कीम वाचवते तुमचा मोठा टॅक्स; कमाईचीही गॅरेंटी, पाहा डिटेल्स
13
"मशालसोबत विशाल अन् हातात घड्याळ"; विशाल पाटील-जयंत पाटील यांच्यात जुगलबंदी!
14
'ते' विधान धनगर समाजाचं अपमान करणारं; सुनील शेळकेंविरोधात बापू भेगडे आक्रमक
15
अर्जुन कपूर या गंभीर आजाराशी करतोय सामना, म्हणाला- "शरीराचं होतंय नुकसान"
16
नाशिकमध्ये आज नरेंद्र मोदींची तोफ धडाडणार; सभेसाठी १ लाख लोक जमवण्याचे महायुतीचे नियोजन
17
सलमान खान अन् लॉरेन्स बिश्नोईवर गाणं लिहिणाऱ्यालाही आली धमकी, म्हणाले, "हिंमत असेल तर..."
18
शरद पवार गटाची फाइट अजित पवार अन् भाजपशी, अनेक मतदारसंघांत थेट सामना; तर काही ठिकाणी पाठिंबा
19
आदित्य, अमित ठाकरे यांच्यामुळे चुरस आणखी वाढली; कोणाचे पारडे राहणार जड? चार मतदारसंघांत मनसेचे महायुती, मविआला आव्हान

Mayawati : "यूपीची मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान होऊ शकते पण राष्ट्रपती नाही"; मायावतींनी सांगितली 'मन की बात'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2022 3:41 PM

Mayawati News : बसपाच्या मायावती यांनी पत्रकार परिषद घेतली आणि समाजवादी पक्षावर (सपा) अनेक गंभीर आरोप केले.

नवी दिल्ली - बसपाचे सरचिटणीस सतीश मिश्रा आणि बसपाचे एकमेव आमदार उमाशंकर सिंह यांनी आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Chief Minister Yogi Adityanath)  यांची भेट घेतली. या बैठकीनंतर बसपाच्या मायावती (Mayawati) यांनी पत्रकार परिषद घेतली आणि यावेळी समाजवादी पक्षावर (सपा) अनेक गंभीर आरोप केले. 2022 च्या यूपी विधानसभा निवडणुकीचा संदर्भ देत मायावती म्हणाल्या की, यूपी निवडणुकीला हिंदू-मुस्लिम रंग देण्यासाठी भाजपा-सपा यांची एकत्र आले. भाजपाने सत्तेत पुनरागमन करण्याची जबाबदारी समाजवादी पक्ष आणि त्यांच्या प्रमुखांवर आहे.

पत्रकार परिषदेत मायावती य़ांनी "सपा लोकांची दिशाभूल करत आहे की मी राष्ट्रपती होणार आहे. मला हे स्पष्ट करायचे आहे की, मी यूपीची मुख्यमंत्री आणि देशाची पंतप्रधान होऊनच देशाची सेवा करू शकते. पण राष्ट्रपती होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मुस्लिमांनी बसपाला मतदान केले तर मी मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान होऊ शकते" असं म्हटलं आहे.  

"बसपा सरकारमध्ये जी स्मारके बांधली गेली, त्यांची देखभाल सपा सरकार आणि भाजपा सरकार करत नाही. बसपाचे शिष्टमंडळ सतीश मिश्रा आणि उमाशंकर सिंह यांनी यासंदर्भात माझे पत्र घेऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. एसपीकडून खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत. मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा हेतू केवळ स्मारकांबाबत होता" असं देखील म्हटलं आहे. 

मायावती म्हणाल्या की, रमजानच्या महिन्यात वीज तोडणे योग्य नाही आणि सरकारने याबाबत काहीतरी केले पाहिजे. मुस्लिम आणि इतरांवरील सर्व अत्याचारांना सपा पक्ष जबाबदार आहे. मायावतींच्या म्हणण्यानुसार, सत्ता गेल्यानंतर त्यांच्या कारकिर्दीत बांधलेल्या उद्यानांची आणि स्मारकांची काळजी घेतली जात नाही. अशा स्थितीत राज्याच्या सरकारने याकडे लक्ष द्यावे, अशी त्यांची इच्छा आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

टॅग्स :mayawatiमायावतीSamajwadi Partyसमाजवादी पार्टीyogi adityanathयोगी आदित्यनाथPoliticsराजकारण