- हरीश गुप्तानवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार महाराष्ट्रात नवा राजकीय अध्याय सुरू करण्याच्या तयारीत आहेत. त्यांच्या इराद्यानुसार फासे पडले, तर बहुजन समाज पक्ष नेत्या मायावती महाराष्ट्रात महत्त्वाची राजकीय भूमिका निभावतील.पवार व मायावती यांची विदर्भात पहिली संयुक्त सभा घेण्याची शक्यताही पडताळून पाहिली जात आहे. गेल्या आठवड्यात दोघांत झालेल्या चर्चेचा तपशील आता समोर येत आहे. महाराष्ट्रातील दलित समाजाला एकत्र आणण्याचा पवार यांचा प्रयत्न आहे. रिपब्लिकन पक्ष अनेक गटांत विभागला असून आहे. राष्टÑवादी काँग्रेस आघाडीत येण्याची प्रकाश आंबेडकर यांची इच्छा नाही. त्यामुळे पवार दुसरा पर्याय शोधत आहेत.काँग्रेस-राष्टÑवादीच्या महाआघाडीत सामील होण्याची मायावती यांची मनापासून तयारी आहे का? याची चाचपणी करण्याच्या उद्देशाने पवार यांनी मायावती यांच्याशी बोलण्याचा निर्णय घेतला. विदर्भ आणि अन्य भागात मायावती यांच्या पक्षाचा चांगला प्रभाव आहे. मायावतींना नेत्या म्हणून समोर आणल्यास भाजपविरोधी जनमत तयार करता येईल, असे त्यांना वाटत आहे. मायावती यांनी आघाडीवर लवकर शिक्कामोर्तब करावा, यासाठी शरद पवार यांनीही मायावती यांची स्वत:हून भेट घेण्याचा मार्ग निवडला.
महाराष्ट्रातील दलितांचे मायावतींनी नेतृत्व करावे; नव्या अध्यायाची नांदी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2018 1:50 AM