लखनऊ : उन्नाव बलात्कार प्रकरणी प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत उत्तर प्रदेशातील भाजपाचे मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांनी मायावती यांच्या तत्कालीन सरकारचे कौतुक केले आहे. मायावती यांचे सरकार अतिशय कार्यक्षम होते, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.एका मुलाखतीत मौर्य म्हणाले की, या प्रकरणी पोलिसांनी त्वरित कारवाई केली असती तर, उच्चस्तरीय चौकशीची गरज पडली नसती. माजी मुख्यमंत्री मायावती यांचे अधिकाऱ्यांवर थेट नियंत्रण असे. त्यांनी अतिशय कुशलतेने काम केले. या प्रकरणात भाजपाचे आमदार कुलदीप सिंग सेंंगर हेच प्रमुख आरोपी आहेत. हे विधान व्हायरल होताच मौर्य यांना खुलासा करावा लागला. ते म्हणाले की, मायावती यांच्या काळातील कायदा आणि सुव्यवस्था ही मागील सपा म्हणजे अखिलेश यादव यांच्या सरकारच्या काळातील सरकारपेक्षा चांगली होती. (वृत्तसंस्था)बसपा ते भाजपा प्रवासमौर्य म्हणाले की, मायावती यांच्या सरकारमधील चांगल्या बाबी आणि उणिवाही आपण दाखविल्या आहेत. त्यांच्या काळात भ्रष्टाचारही अधिक होता. ६४ वर्षीय मौर्य यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी बसपाला सोडचिठ्ठी दिली होती. तत्पूर्वी, त्यांनी बसपावर आरोप केला होता की, त्यांचे नेते तिकिटांची विक्री करत आहेत. त्यानंतर त्यांनी भाजपात प्रवेश केला होता.
मायावती यांचे सरकार होते कार्यक्षम; योगींच्या मंत्र्यांचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 1:00 AM