मेहरुणच्या बोरांनाही कमी पावसाचा फटका भाव मात्र स्थिर : २५ टक्क्याने उत्पादन घटले
By admin | Published: December 16, 2015 11:50 PM
जळगाव : राज्यभरात प्रसिद्ध असलेल्या मेहरुणच्या बोरांनाही कमी पावसाचा फटका बसून यंदा त्यांचे उत्पादन २५ टक्क्याने घटले आहे. असे असले तरी भावात मात्र वाढ नसल्याने ग्राहकांना तेवढा दिलासा मिळाला आहे.
जळगाव : राज्यभरात प्रसिद्ध असलेल्या मेहरुणच्या बोरांनाही कमी पावसाचा फटका बसून यंदा त्यांचे उत्पादन २५ टक्क्याने घटले आहे. असे असले तरी भावात मात्र वाढ नसल्याने ग्राहकांना तेवढा दिलासा मिळाला आहे. कमी पावसाचा फटकाया वर्षी कमी पावसामुळे सर्वच पिकांना मोठा फटका बसला. त्यात मेहरुणचे बोरही सुटलेले नाही. कमी पावसामुळे त्यांच्या उत्पादनात घट होऊन दरवर्षीच्या तुलनेत यंदा ७५ टक्केच उत्पादन आल्याचे उत्पादकांनी सांगितले. हंगामही उशिराएरव्ही दरवर्षी नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस मेहरुणचे बोर येण्यास सुरुवात होते. यंदा मात्र त्यांची आवकही उशिरा सुरू झाली. डिसेंबरच्या दुसर्या आठवड्यापासून हे बोर बाजारात येण्यास सुरुवात झाली. इतकेच नव्हे हंगामही लवकर संपणार असल्याची स्थिती आहे. दरवर्षी जानेवारी अखेरपर्यंत मेहरुणच्या बोरांचा हंगाम चालतो. मात्र यंदा सध्याची उत्पादन स्थिती पाहता जानेवारीच्या दुसर्या आठवड्यापर्यंतच हे बोर येण्याचा अंदाज असल्याचे उत्पादक भरत सुरवाडे यांनी सांगितले.दर्जा चांगलाचपावसामुळे केवळ बोराच्या उत्पादनावर परिणाम होऊन त्यांची आवक गेल्यावर्षीच्या तुलनेत घटली आहे. मात्र दर्जावर याचा कोणताही परिणाम झाला नसून बाजारात दर्जेदार बोर येत आहे. भाव स्थिर असल्याने दिलासायंदा उत्पादन घटले असले तरी बोरांच्या भावात वाढ नाही. एरव्ही कोणत्याही वस्तूचे उत्पादन कमी झाले तर त्यांचे भाव वाढतात, मात्र बोरांच्या बाबतीत हा अर्थशास्त्रीय नियम लागू न झाल्याने यंदाही बोरांचे भाव २५ ते ३० रुपये प्रतिकिलो आहे. त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. दररोज तीन ते चार टनची आवकसध्या जळगाव बाजारपेठेत दररोज तीन ते चार टन मेहरुणच्या बोरांची आवक होत आहे. काही ठिकाणी व्यापारी तर काही ठिकाणी स्वत: बोर उत्पादक बोरांची विक्री करीत आहे. गेल्या वर्षी आवकचे प्रमाण चार ते पाच टन होते. यंदा मात्र पावसाचा फटका बसून त्यात घट झाली आहे. शहरीकरण वाढले...ज्या मेहरुणच्या नावाने हे बोर प्रसिद्ध आहे, त्या मेहरुण भागात हळूहळू शहरीकरण वाढून तो भाग जळगाव शहरात येत आहे. त्यामुळे या शहरीकरणाचाही परिणाम होऊन या बोरांची झाड कमी होत चालली आहे. त्याचाही आवकवर परिणाम होत असल्याचे विक्रेत्यांना सांगितले.