Adesh Gupta Resigns: दिल्ली महानगरपालिकेत (MCD) मिळालेल्या पराभवानंतर दिल्लीचेभाजपाध्यक्ष आदेश गुप्ता (Adesh Gupta) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. आदेश गुप्ता यांनी नुकत्याच झालेल्या दिल्ली एमसीडी निवडणुकीत मिळालेल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
आपने भाजपची सत्ता उलथून लावलीदिल्ली एमसीडी निवडणुकीत आम आदमी पार्टीला 134, भाजपला 104, काँग्रेसला 9 आणि इतरांना 3 जागा मिळाल्या आहेत. एमसीडीमध्ये 15 वर्षे सत्तेत असलेल्या भाजपला आम आदमी पक्षाकडून दारूण पराभव पत्करावा लागला, यामुळेच आदेश गुप्ता यांनी पदाचा राजीनामा दिला. आदेश गुप्ता यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्याकडे राजीनामा सोपवला असून, त्यांनीही राजीनामा स्विकारला आहे.
दोन्ही पक्षांचा एकमेकांवर घोडेबाजाराचा आरोपएमसीडी निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता आम आदमी पार्टी आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. दोन्ही पक्ष एकमेकांवर घोडेबाजाराचा आरोप करत आहेत. शनिवारी, भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला आणि दिल्ली युनिटचे मीडिया सेलचे प्रमुख हरीश खुराना यांनी