ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 26 - राजधानीतल्या तिन्ही मनपामध्ये (दक्षिण दिल्ली, पूर्व दिल्ली, उत्तर दिल्ली) भाजपाला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. त्यामुळे दिल्लीत भाजपाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला आहे. त्यानंतर भाजपा अध्यक्ष अमित शाहा यांनी पत्रकार परिषद घेऊन दिल्लीकरांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल आभार मानले आहेत.
ते म्हणाले, दिल्लीच्या जनतेनं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या तीन वर्षांच्या पारदर्शक कामकाजावर शिक्कामोर्तब केले आहे. दिल्लीच्या निकालानंतर भाजपाचा विजयरथ आता प्रगतिपथावरच राहील. आता कोणाचेही नकारात्मक राजकारण चालणार नाही. दिल्लीचा विजय म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेसाठी राबवलेल्या गरीब-कल्याण योजना आणि सबका साथ सबका विकास या नीतीचा विजय आहे.
दिल्लीची जनता आणि बहिणींनी आरोपांच्या राजकारणाला झिडकारत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील विकसित राजकारणावर विश्वास दाखवला आहे. मला विश्वास आहे की, भाजपाचे नवनिर्वाचित नगरसेवक हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लोककल्याणकारी नीतीअंतर्गत दिल्लीचा विकास करतील. दिल्लीच्या घवघवीत यशाबद्दल अमित शाहा यांनी मनोज तिवारी आणि भाजपा कार्यकर्त्यांनाही शुभेच्छा