शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
2
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
3
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
4
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
5
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
6
तिरुपतीच्या लाडूंच्या विक्रीतून वर्षांला ५०० कोटींचा महसूल; पाहा किती जुना आहे 'मिठा प्रसादम'चा इतिहास
7
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
8
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
9
जबरदस्त क्रेझ... दर तीन मिनिटांना एका iPhone 16 ची विक्री; Blinkit आणि BigBasket वरही ग्राहकांची रांग
10
"५० खोक्यांचा मुकूट, विरोधी पक्ष फोडाया बुद्धी..."; नवरा माझा नवसाचा २ च्या भारूडाची जोरदार चर्चा
11
"राजकारण असा धंदा जिथे सामान्यांच्या शिव्या..."; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना
12
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
14
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
15
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
16
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
17
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
18
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
19
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
20
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर

MCD Mayor Election : अखेर दिल्लीला मिळाला नवीन महापौर; मनीष सिसोदिया म्हणाले- 'गुंडांचा पराभव, जनतेचा विजय...'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2023 2:30 PM

MCD Mayor Election : आम आदमी पक्षाच्या 39 वर्षीय शैली ओबेरॉय दिल्लीच्या महापौर झाल्या आहेत.

MCD Mayor Election 2023: अनेक दिवसांच्या गोंधळानंतर आज अखेर दिल्ली महानगरपालिका म्हणजेच एमसीडीमध्ये महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक शांतेत पार पडली. यात आम आदमी पक्षाच्या उमेदवार शैली ओबेरॉय विजयी झाल्या आहेत. शेली ओबेरॉय या दिल्लीच्या पटेल नगर विधानसभेच्या वॉर्ड क्रमांक 86 मधील नगरसेवक आहेत. 39 वर्षीय शैली ओबेरॉय या व्यवसायाने प्राध्यापक आहेत.

बुधवारी सकाळी 11.30 च्या सुमारास मतदानाला सुरुवात झाली आणि 2 तासांपेक्षा जास्त वेळ मतदान चालले. यानंतर दुपारी दोनच्या सुमारास मतमोजणीला सुरुवात झाली. दिल्लीच्या महापौरपदाच्या निवडणुकीत एकूण 10 नामनिर्देशित खासदार, 14 नामनिर्देशित आमदार आणि निवडून आलेल्या 250 पैकी 241 नगरसेवकांनी मतदान केले. आम आदमी पक्षाचे सभागृह नेते मुकेश गोयल यांच्या विनंतीवरुन महापौरपदाच्या निवडणुकीत वेळ वाचवण्यासाठी दोन बूथमध्ये मतदान सुरू करण्यात आले होते.

या विजयानंतर दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी ट्विट केले. त्यांनी लिहिले - 'गुंडांचा पराभव झाला, जनता जिंकली. दिल्ली महानगरपालिकेत आम आदमी पक्षाचा महापौर झाल्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांचे खूप खूप अभिनंदन आणि पुन्हा एकदा दिल्लीच्या जनतेचे मनापासून आभार. AAP च्या पहिल्या महापौर शैली ओबेरॉय यांचे अभिनंदन,' असे ट्विट त्यांनी केले.

दोन महिन्यांपूर्वी झाली निवडणूकविशेष म्हणजे, गेल्या वर्षी 4 डिसेंबर 2022 रोजी दिल्ली MCD च्या 250 जागांवर मतदान झाले होते आणि निकाल 7 डिसेंबरला आला होता. यामध्ये आम आदमी पार्टीला बहुमत मिळाले होते. आम आदमी पक्षाने 250 पैकी 134 जागा जिंकल्या होत्या, तर भारतीय जनता पक्ष 104 जागांवर घसरला होता. यापूर्वी 6 जानेवारी, 24 जानेवारी आणि 6 फेब्रुवारीला महापौरपदाच्या निवडणुकीसाठी बैठका झाल्या, पण सभागृहात दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी मोठा गोंधळ घातला. 

त्यानंतर आम आदमी पक्षाचे नेते आणि आमदार आतिशी यांनी पक्ष हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात नेणार असल्याचे सांगितले होते. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने एमसीडीची बैठक घेण्याच्या सूचना दिल्या. यासोबतच उपमहापौरपदासाठी आपकडून आलेले मोहम्मद इक्बाल आणि भाजपकडून कमल बागडी हे उमेदवार होते. स्थायी समिती सदस्यपदासाठी आपचे आमिल मलिक, सारिका चौधरी, मोहिनी जिनवाल आणि रामिंदर कौर आणि भाजपकडून कमलजीत सेहरावत, गजेंद्र दराल आणि पंकज लुथरा हे उमेदवार होते. 

 

टॅग्स :delhiदिल्लीElectionनिवडणूकPoliticsराजकारणAAPआपBJPभाजपा