नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने माजी भारतीय कर्णधार मोहम्मद अझहरुद्दीन याच्या नेतृत्वाखालील हैदराबाद क्रिकेट संघटनेची कार्यकारिणी बरखास्त केली आहे. यामुळे अझहरुद्दीनला अध्यक्षपद गमवावे लागले. एमसीएचा कारभार पाहण्यासाठी कोर्टाने सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्या. एल. नागेश्वर राव यांची कामकाजावर देखरेख ठेवण्यासाठी आणि आगामी निवडणुका आयोजित करण्यासाठी नियुक्ती केली.
सप्टेंबर २०२२ पासून मोहम्मद अझहरुद्दीन यांनी निवडणूक घेण्यास टाळाटाळ चालविल्याने विद्यमान कार्यकारिणी विरोधात प्रतिस्पर्धी गटाने न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने हा आदेश दिला.