शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
3
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
4
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
5
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
6
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
7
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
8
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
13
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
14
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
15
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
16
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
17
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
20
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम

MDH New Face: धरमपाल गुलाटी यांची जागा कोणी घेतली? MDH मसालेच्या जाहिरातींमध्ये दिसतोय नवा चेहरा...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2022 9:04 PM

MDH Masale New Face: मसाले किंग धरमपाल गुलाटी यांच्या मृत्यूनंतर एमडीएच मसालेच्या जाहिरातींमध्ये एक नवीन चेहरा दिसत आहे.

MDH New Face Revealed: MDH मसाले हे भारतातील सर्वात प्रसिद्ध मसाल्यांपैकी एक आहेत. मसाला किंग आणि एसडीएचचे शिल्पकार म्हणून प्रसिद्ध असलेले धरमपाल गुलाटी यांनी कठोर परिश्रमानंतर या कंपनीला देशातील सर्वात यशस्वी कंपन्यांपैकी एक बनवले आहे. 1919 मध्ये त्यांचे वडील चुन्नीलाल गुलाटी यांनी महाशियां दी हत्ती म्हणजेच MDH सुरू केले. स्वातंत्र्यानंतर त्यांचे कुटुंब भारतात आले. त्यानंतर महाशय धरमपाल गुलाटी यांनी अवघ्या 1000 रुपयांमध्ये ही कंपनी सुरू केली. आपल्या मेहनतीच्या जोरावर त्यांनी मोठे यश संपादन केले. मात्र काही काळापासून एमडीएचच्या जाहिरातींमध्ये एक नवा चेहरा पाहायला मिळत आहे. अनेकांना उत्सुकता लागली आहे की, हा नवीन व्यक्ती कोण आहे..?

जाहिरातींमध्ये दिसणारा नवा चेहरा कोण?MDH चे मालक महाशय धरमपाल गुलाटी यांचे डिसेंबर 2020 मध्ये निधन झाले. यानंतर ही कंपनी विकली जाणार असल्याची अफवा उडू लागली. त्याचवेळी मसाल्यांच्या जाहिरातींमध्ये त्यांची जागा कोण घेणार, अशीही चर्चा रंगली होती. दरम्यान, एमडीएच स्पाइसेसच्या जाहिरातींमध्ये नवा चेहरा दिसू लागला. हा नवा चेहरा दुसरा कोणी नसून धरमपाल गुलाटी यांचा मुलगा आणि कंपनीचे चेअरमन राजीव गुलाटी आहेत. धरमपाल गुलाटी यांच्या निधनानंतर राजीव गुलाटी यांनीही कंपनीबाबतच्या अफवांवर ट्विटरवर प्रतिक्रिया दिली.

काय म्हणाले राजीव गुलाटीराजीव गुलाटी यांनी ट्विट करून अफवांचे खंडन केले आणि लिहिले की, 'ही बातमी पूर्णपणे खोटी, बनावट आणि निराधार आहे. MDH प्रायव्हेट लिमिटेड हा आमचा वारसा आहे, जो महाशय चुन्नीलाल आणि महाशय धरमपाल यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य खर्ची घालून उभारला आहे. तो वारसा पुढे नेण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. कृपया अशा अफवांवर लक्ष देऊ नका, विश्वास ठेवू नका.' दरम्यान, आता राजीव आपल्या वडिलांचा वारसा पुढे चालवणार असून, कंपनीच्या पुढे येणाऱ्या जाहिरातींमध्येही ते दिसणार आहेत.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटकेAdvertisingजाहिरात