नवी दिल्ली - माजी केंद्रीय मंत्री एम. जे. अकबर यांनी पत्रकार प्रिया रमानी यांच्यावर मानहानीचा दावा दाखल केला होता. एम.जे. अकबर यांच्याविरुद्ध बलात्काराची तक्रार रमानी यांनी दिली होती. त्यानंतर, अकबर यांनी रमानी यांनाच्या आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले होते. याप्रकरणी दिल्लीन्यायालयाने आज निकाल दिला. दिल्ली न्यायालयाने पत्रकार प्रिया रमानी यांची निर्दोष मुक्तता केली आहे. त्यामुळे, अकबर यांना न्यायालयने मोठा झटका दिल्याचे दिसून येते.
एडिशनल चीफ मेट्रोपोलिटन मॅजिस्ट्रेट रवींद्र कुमार पांडे यांनी दोन्ही पक्षांच्या उपस्थितीत एका ओपन न्यायालयात हा निर्णय दिला. लैंगिक शोषण हे महिलांचा आत्मसन्मान आमि आत्मविश्वास दोन्हीला नष्ट करते, असे मत न्यायालयाने नोंदवले आहे. त्यामुळे, महिलांकडे दशकांनंतरही आपली तक्रार करण्याचा अधिकार असल्याचेही न्यायालयाने म्हटले. दरम्यान, २०१८ साली सुरू झालेल्या 'मी टू' या ऑनलाईन मोहिमेवेळी पत्रकार प्रिया रमानी यांनी तत्कालीन केंद्रीय राज्यमंत्री एम जे अकबर यांच्याविरोधात लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. यामुळे एम जे अकबर यांना परराष्ट्र राज्यमंत्री पदाचा राजीनामाही द्यावा लागला होता. त्यामुळे चिडलेल्या अकबर यांनी प्रिया रमानी यांच्याविरोधात मानहानीची तक्रार दाखल केली होती. आज (बुधवारी) याच प्रकरणात निकाल देताना दिल्ली न्यायालयानं एम जे अकबर यांचे आरोप फेटाळताना प्रिया रमानी यांना मानहानी प्रकरणात दोषी ठरवण्यास नकार दिलाय.
अकबर यांच्यावर तब्बल 15 महिलांनी लैंगिक अत्याचाराचे आरोप केल्यानं अकबर यांनी परराष्ट्र राज्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. प्रिया रमानी यांच्या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात एकच गहजब उडाला होता. त्यामुळे १७ ऑक्टोबर २०१८ रोजी एम जे अकबर यांना आपल्या केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर १५ ऑक्टोबर २०१८ रोजी अकबर यांनी प्रिया रमानींविरोधात मानहानीचा गुन्हा दाखल केला.