नवी दिल्ली - काश्मीर प्रश्नावर पाकिस्तानकडून देण्यात येत असलेल्या चिथावणीखोर आणि बेजबाबदार वक्तव्यांचा भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने तीव्र शद्बांत निषेध नोंदवला आहे. तसेच भारताच्या अंतर्गत प्रश्नांबाबत न बोलण्याचा सल्ला पाकिस्तानला दिला आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, पाकिस्तानचा हेतू या भारातील परिस्थिती चिघळवण्याचा आहे. त्यासाठी पाकिस्तान कपोलकल्पित आणि आधारहीन गोष्टींच्या माध्यमातून वातावरणनिर्मिती करण्याच्या प्रयत्नात आहे. तसेच भारतात हिंसाचार भडकवण्याचा प्रयत्न आणि जिहादचे आवाहन पाकिस्तानकडून करण्यात येत आहे, असा आरोपही परराष्ट्र मंत्रालयाने केला.
आमच्या अंतर्गत प्रश्नात नाक खूपसू नका, काश्मीरवरून परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानला सुनावले खडेबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2019 7:18 PM